शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांची लाखोंची उड्डाण

By admin | Updated: January 19, 2015 00:22 IST

सरस प्रदर्शन : तब्बल २८लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले े

रत्नागिरी : स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडत असलेल्या महिला बचत गटांनी जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनामध्ये ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने विक्रीची लाखोंची उड्डाणे पार केली. या प्रदर्शनात २८ लाख रुपये मालाची विक्री झाली़ ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंसहाय्यता बचत गटांची स्थापना केली आहे़ या बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ‘स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजने’अंतर्गत प्रदर्शन व विक्री जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येते़ हे जिल्हास्तरिय सरस प्रदर्शन व विक्री २०१४ रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे दि़ २४ ते २८ डिसेंबर या कालावधीमध्ये लावण्यात आले होते़ हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास यंत्रणा यांनी विशेष मेहनत घेतली़ या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील ८६ बचत गट सहभागी झाले होते़ वर्षाच्या सरत्या दिवसांमध्ये हे व्रिकी व प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याने हजारो पर्यटकांनी पाच दिवसांमध्ये भेटी दिल्या़ या प्रदर्शनामध्ये बचत गटांनी तयार केलेले, कोकणी पध्दतीचे खाद्यपदार्थ ते शोभेच्या वस्तू अशा सर्वच मालाला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला़ त्यामुळे २८ लाख रुपयांची उलाढाल झाली़ ग्राहकांची गर्दी पाहून बचत गटांच्या महिलांनीही उत्साहाने आपल्या मालाची जास्तीत जास्त विक्री कशी करता येईल, त्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याने ते यशस्वीही झाले़ (शहर वार्ताहर)उत्कृष्ट विक्री झालेले बचत गटप्रथम क्रमांक- श्रेयस स्वयंसहाय्यता बचत गट, ता़ गुहागरद्वितीय क्रमांक- भैरवनाथ स्वयंसहाय्यता बचत गट, ता़ दापोली़तृतीय क्रमांक- झोलाईदेवी स्वयंसहाय्यता बचत गट, ता़ चिपळूण