शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहून जाणाऱ्या पर्यटकांना वाचविले

By admin | Updated: July 16, 2014 23:16 IST

झरेबांबर येथील घटना : वृक्ष कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

दोडामार्ग : अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिंकाणचे कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. झरेबांबर येथील कॉजवेवरून मांगेली येथे वर्षा पर्यटनासाठी गेलेले पर्यटक वाहून जाण्याची घटना घडली. मात्र ग्रामस्थांनी त्यांना वाचविले. आंबेली कोनाळकरवाडी येथे जुनाट वृक्ष कोसळल्याने वाहतूक तीन तास ठप्प होती. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर जाणवत आहे. झरेबांबर येथील कॉजवेवरुन वाट काढीत असताना गोव्यातील दोघे पर्यटक वाहून जाण्याची घटना घडली. हे पर्यटक दुचाकीने मांगले येथे वर्षा पर्यटनासाठी गेले होते. माघारी येताना झरेबांबर येथील ओहोळावर ते पोहोचले. पुलावर पाणी असल्याने अन्य वाहनचालक व प्रवासी पाणी ओसरण्याची वाट पाहत होते. मात्र, या अतिउत्साही पर्यटकांनी पाण्याच्या प्रवाहातूनच पलीकडे जाण्याचा निर्णय घेतला. पुलावरील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुचाकी पुलाच्या मधोमधच जाऊन बंद पडली. आणि दोन्ही पर्यटक वाहून जाऊ लागले. हा प्रकार उपस्थित वाहनचालकांच्या लक्षात येताच त्यांनी पर्यटकांना वाचविले. ते पर्यटक गोव्यातीलच असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, त्यांची नावे उशीरापर्यंत समजू शकलेली नाहीत.दरम्यान, बुधवारी दुपारी आंबेली परिसरात वादळी वारा सुरु झाला होता. त्यामुळे दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावरील जुनाट वृक्ष कोसळला. झाड पडल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प होती. सायंकाळी उशीरा झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मुसळधार पावसामुळे तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. दोडामार्ग शहरासही आयी, माटणे, आंबडगाव या भागातील वीज गायब होती. बुधवारी संपूर्ण दिवसभर वीजेचा लपंडाव सुरूच होता. (प्रतिनिधी)