शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाळयेतील जंगलात सांबराची शिकार

By admin | Updated: February 2, 2016 21:25 IST

वीजेचा धक्का लावण्याचा प्रकार : ग्रामस्थांना पाहताच शिकाऱ्यांचा पोबारा

दोडामार्ग : पाळये साळीचे टेंब येथील जंगलात सांबराची शिकार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. वीजेचा धक्का देऊन ही शिकार करण्यात आली. मृत सांबराचे मांस कापताना गावातीलच काही ग्रामस्थ त्याठिकाणी पोहोचताच शिकाऱ्यांनी अर्धवट कापलेले सांबर तेथेच टाकून पोबारा केला. याबाबतची तक्रार कोनाळ येथील वनविभागाच्या कार्यालयात दिल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पाळये साळीचे टेंब येथील जंगलात रस्त्याच्या उजव्या बाजूला काही अंतरावर सांबराची शिकार करून त्याचे मांस कापले जात असल्याची माहिती गावातीलच ग्रामस्थ तुकाराम दळवी, राजाराम दळवी व इतरांना मिळाली. त्यांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी सांबराची शिकार करून त्याचे मांस कापले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गावातील ग्रामस्थ आल्याचे पाहताच तेथील शिकाऱ्यांनी अर्धवट कापलेले सांबर त्याचठिकाणी टाकून घटनास्थळावरून पोबारा केला. ग्रामस्थांनी पाहणी केली असता सांबराच्या पोटातील कोथळा तेथील नाल्यात टाकला असल्याचे दिसून आले. तसेच एका बाजूचा पाय व कातडी सोलून टाकण्यात आल्याचे आढळले. ग्रामस्थांनी लागलीच या घटनेबाबत कोनाळ येथील वनविभागाच्या कार्यालयात दूरध्वनीवरून सांबराच्या शिकारीची कल्पना दिली. त्यानंतर कोनाळ वनपाल डी. बी. देसाई, वनरक्षक विश्राम कुबल व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जात पंचनामा केला. मृत सांबराचे शीर घटनास्थळावर आढळून आले नाही. मात्र, सांबर नर जातीचे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी हे शिकारी गावातीलच काही जण असल्याचा आरोप केला. दरम्यान, वनपाल डी. बी. देसाई यांनी चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी) फोटो : सोशल मिडीयावर सांबराची शिकार केल्यानंतर मृत सांबर कापताना गावातील काही ग्रामस्थ घटनास्थळावर पोहोचले. त्यावेळी एकाने शिकाऱ्यांचे फोटो आपल्याकडील मोबाईलने काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वनविभागाला शिकाऱ्यांचा शोध सहजपणे लावण्यास मदत होणार आहे.