शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची सत्त्वपरीक्षा

By admin | Updated: November 29, 2015 00:57 IST

सावंतवाडी पंचायत समिती : शौचालय घोटाळ्यामुळे अडचणीत

सावंतवाडी : वेर्लेतील शौचालय घोटाळयाचा अहवाल सोमवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडण्यात येणार असल्याने सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. आधीच चार सदस्याच्या निलंबामुळे सत्ताधारी कॉंग्रेस अल्पमतात आलेली असताना या अहवालामुळे विरोधी पक्ष काँग्रेसवर कसा आक्रमण करतो आणि त्याला काँग्रेस कसे प्रतिउत्तर देणार, याची परीक्षाच पाहायला मिळणार आहे. वेर्ले येथे शौचालय घोटाळ्याचा आरोप करीत पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांनी सत्ताधारी कॉग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. मागील पंचायत समिती बैठकीत यावरून वादळी चर्चा झाली होती. काही काळ बैठकीचे कामकाज ही थांबले होते. मात्र सभापती प्रमोद सावंत यांनी वेर्ले येथील शौचालय घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार, असे सांगितले. त्याप्रमाणे गट विकास अधिकारी मोहन भोई यांनी कृषी अधिकारी विनायक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने गेले महिनाभर या प्रकरणाची कसून चौकशी केली त्यानंतर हा अहवाल तयार केला. मात्र दोन दिवसा पूर्वी हा अहवाल गटविकास अधिकारी भोई यांच्याकडे देणार असल्याचे या समितीने स्पष्ठ केले होते. पण अहवाल अद्यापपर्यंत देण्यात आला नाही. अखेर सोमवारी होणाऱ्या मासिक बैठकीत हा अहवाल ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. हा अहवाल पंचायत समिती बैठकीत वाचला जाणार असल्याने यावर दोषींवर कारवाई करणे पंचायत समितीला भाग पडणार आहे. मात्र अहवाल डावलला तर कॉंग्रेसकडे पुरेशे संख्याबळ नाही. कॉंग्रेसचे उपसभापती महेश सारंग, सदस्य सुनयना कासकर, नारायण राणे, विनायक दळवी आदींना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी निलंबित केले असून त्यांच्या याचिकेचा अंतिम निर्णय १ डिसेंबरला येणार आहे. शिवसेनेने घोटाळा बहाद्दरांवर कारवाई व्हावी यासाठी मंत्रालय पातळीवर मागणी केली असून पंचायत समितीच्या प्राथमिक अहवालावर बैठकीत काय निर्णय होणार यावर पंचायत समितीचे भवितव्य अवलबंून राहाणार आहे. (प्रतिनिधी) सभापतींची माहिती : ‘त्यामुळे’ अहवालास विलंब ४सावंतवाडी पंचायत समितीने वेर्ले येथील शौचालयाच्या तक्रारीचा अहवाल मागवला असून हा अहवाल तयार करण्यास विलंब लागण्याचे कारण म्हणजे हा अहवाल तयार करण्यास पुरेसा अधिकारी व कर्मचारीवर्ग पंचायत समितीकडे नाही. त्यामुळे अहवालास विलंब झाला असून हा अहवाल पंचायत समिती बैठकीतच माडला जाईल. त्यावेळीच या अहवालावर विस्तृत अशी चर्चा घडवून आणली जाणार असल्याचे यावेळी सभापती प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही आमचा कार्यकाल पूर्ण करणार : संजू परब ४पंचायत समितीवर कोणी कितीही आरोप करू दे, तेथील कारभार चांगला आहे. यापूर्वीही अनेक जण सांगत होते. पंचायत समितीवर आमचा झेंडा लागणार. पण नियतीने तसे घडू दिले नाही. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून, काँग्रेस कार्यकाल पूर्ण करेल याचा आम्हाला विश्वास आहे, असे मत काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले. दोडामार्गमध्ये काँग्रेसने चत्मकार घडवला, तसा चमत्कार घडवण्याची ताकद फक्त कॉंग्रेसमध्ये असल्याचा टोलाही त्यांनी शिवसेनेला हाणला.