शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सातेरी जलमंदिर जत्रोत्सव

By admin | Updated: July 25, 2016 00:38 IST

भाविकांची गर्दी : भक्तीमय वातावरण

मालवण: बिळवस येथील नवसाला पावणारी श्री सातेरी जलमंदिरचा वार्षिक आषाढी जत्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार असली तरीही हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यावर्षीपासून देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळपासून ओटी भरणे व नवस बोलणे-फेडणे कार्यक्रम घेण्यात आला होता. तर दुपारी १ वाजता देवीला महाप्रसाद (ताटे) लावण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पुन्हा दर्शन व ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. 'सातेरी देवी नमो नम:' या जयघोषात बिळवस गाव भक्तीरसात भिजून गेले होते. यात्रोत्सावाची व्याप्ती दरवर्षी वाढत असल्याने देवस्थान ट्रस्ट तसेच बिळवस ग्रामस्थांच्या वतीने चोख नियोजन करण्यात येते. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी रांगातून दर्शनाची सोय होती तसेच प्रथमच भाविकांसाठी वाहने पार्क करण्यासाठी वाहनतळ आखण्यात आला होता. यात्रोत्सवासाठी मालवण एसटी आगराच्यावातीने जादा बसफेरी सोडण्यात आली होती तर मालवण पोलिस व मसुरे दूरक्षेत्र यांच्या सहकार्याने जत्रा सुरळीत पार पडली. गोवा, कर्नाटक, मुंबई तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी सकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती छोटू ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब, शिवाजी परब, मसुरे सरपंच लक्ष्मी पेडणेकर, उपसरपंच राहुल परब, राजेंद्र प्रभुदेसाई, भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, सुधीर साळसकर, बाबू परब यांच्या सह अन्य पदाधिका?्यानी दर्शन घेतले. यावर्षी प्रथमच यात्रेच्या ठिकाणी कॉंग्रस पक्षाचे कार्यालय थाटण्यात आले होते. मंदिराच्या समोरील मुख्य रस्त्यालगत काही भाग रस्त्याचे रुंदीकरणासाठी हटविण्यात आला आहे. पावसामुळे येथे चिखलमय पाणी मुख्य रस्त्यावर आले होते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चिखलमय पाण्यातूनच मंदिराच्या ठिकाणी जावे लागत होते. याबाबत भाविकांच्या गैरसोयी बद्दल देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली जात होती. भाविकांना तत्काळ दर्शन घेता यावे चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यावेळी देवस्थान ट्रस्टचे शशिकांत पालव, लक्ष्मण पालव, सदानंद पालव, सुर्यकांत पालव यांच्यासह गोपी पालव, संतोष पालव, अमित पालव उपस्थित होते. (प्रतिनिधी)