शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सडुरेत अवतरले ‘प्रतिशिराळे’

By admin | Updated: January 6, 2017 23:20 IST

वार्षिक गावपळण : आठवड्यासाठी गाव झाले सुने-सुने

वैभववाडी : पुर्वजांच्या हातून घडलेल्या पातकाचे प्रायश्चित म्हणा किंवा ग्राम देवतेवरील श्रध्दा! पण शिराळे मात्र प्रतिवर्षीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी पुरते सुनेसुने झाले. दुपारी तीनच्या सुमारास गावपळणीसाठी शिराळेवासियांनी आठवड्याचे गाठोडे घेऊन पाळीव प्राणी, पक्षांसह गावकुसाबाहेरचा मार्ग चोखाळला. त्यामुळे शिराळे गाव निर्मनुष्य होऊन पुरते सुनेसुने झाले. सुमारे पन्नास कुटुंबांच्या अडीचशे लोकवस्तीचे शिराळे सडुरेच्या माळावर जेमतेम २५ ते ३0 गुंठ्यात वसलेले दिसते. आठवडाभर ही वस्ती ‘प्रतिशिराळे’ म्हणूनच ओळखली जाईल. शिराळेची वार्षिक गावपळण संपूर्ण कोकण पट्ट्यातील सर्वात मोठी गावपळण असून ती नित्यनेमाने आणि त्याच श्रद्धाभावाने आनंदात पार पाडली जाते. ‘नाडेघोरीप’ करण्यासाठी बांधलेली शीव मोकळी झालीच नाही तर शेताच्या राखणीला उपयुक्त ठरेल, या हेतूने शिराळेवासियांच्या पुर्वजांच्या हातून पातक घडले. आणि याचे प्रायश्चित म्हणून पातक मुक्तीसाठी ग्रामदेवतेने गाव ओस ठेवण्याची आज्ञा केली. तीच आज्ञा पालन म्हणून कित्येक पिढ्या शिराळेवासिय दरवर्षी गावपळण करीत आहेत, अशी आख्यायिका तेथील वृद्ध जाणकार सांगतात. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास आठवड्याची शिदोरी घेऊन पाळीव पक्षी, प्राण्यांसह शिराळे वासियांनी घराचा उंबरठा ओलांडला. वृद्ध, स्त्रिया, लहान मुले एसटीने सडुरेच्या 'वास्तव्य'स्थळी दाखल झाली. तर पुरुष मंडळी पाळीव प्राणी, पक्षांसमवेत सुमारे पाच किलोमीटर पायपीट करून अंधार पडता पडता ‘प्रतिशिराळे’त पोहोचली. गावपळणीमुळे सर्वांचे चेहरे वेगळ्याच आनंदाने पुलकित झाले होते. शनिवारपासून पाच सहा दिवस कोणत्याही ताणतणावाशिवाय निसर्गाच्या सानिध्यात सर्व शिराळेवासिय गुण्यागोविंदाने 'एन्जॉय' करताना पहायला मिळतील. पाचव्या दिवशी श्री देव गांगोकडे परतीचा कौल मागितला जाईल, आणि ग्रामदेवतेच्या आदेशानंतर शिराळे गाव पुन्हा गजबजलेले दृष्टीस पडेल.प्रशासनही पाळते आज्ञागावपळणीच्या काळात शिराळेची शाळाही सडुरेच्या माळावरील आंब्याखाली भरते. गावात जाणाऱ्या एस. टी. बससुद्धा 'प्रतिशिराळे'तूनच वळून माघारी फिरतात. याचे कारण म्हणजे गावकऱ्यांच्या ग्रामदेवतेवरील श्रद्धेला बाधा पोहोचू नये एवढेच आहे. त्यामुळे गावकऱ्यांप्रमाणे प्रशासनाचे प्रतिनिधीही अशा पद्धतीने गावपळणीत सामील झालेले दिसून येतात.