शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाच्या घरावर बहिष्कार

By admin | Updated: December 16, 2014 00:14 IST

मतदान केल्याचा राग : केळुस कालवीवाडी येथील घटना

वेंगुर्ले : मागील विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केले, या रागातून कालवीवाडीतील ग्रामस्थांनी घरावर बहिष्कार टाकला असल्याची तक्रार केळूस सरपंच करिश्मा खवणेकर व पत्रकार कृष्णा खवणेकर यांनी निवती पोलीस ठाण्यात केली आहे.विधानसभा निवडणुकीवेळी कालवीवाडीतील मच्छिमार ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आपला भाऊ, भावजय व वडील यांनी ग्रामस्थांच्या भीतीपोटी मतदान केले नाही. मात्र, आपण पत्रकार असल्याने व पत्नी करिश्मा ही केळूस गावची प्रथम नागरिक असल्याने आम्ही दोघांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचा राग आल्याने कालवीवाडीतील ग्रामस्थांनी २१ आॅक्टोबर रोजी सभा घेतली. या सभेत माझा भाऊ विद्याधर खवणेकर यास बोलावून गणाधीश केळूसकर यांनी धमकावले. तुझ्या भाऊ व भावजय यांनी मतदान केल्याने आजपासून तुमच्याकडे कोणत्याही कार्यक्रमास मच्छिमार समाजातील कोणीही येणार नसल्याचे सांगून घरावर बहिष्कार टाकला. त्यानंतरही गावातील काही लोक आमच्याकडे येत जात होते. त्या रागातून बाबुराव ताम्हणकर, महेश राऊळ, गोविंद केळूसकर, सुदाम राऊळ, केशव ताम्हणकर, कृष्णा राऊळ यांनी मच्छिमार बांधवांना भडकावून पुन्हा ५ डिसेंबर रोजी बैठक घेतली. या बैठकीस आपणासही बोलाविण्यात आले होते. त्यावेळी तू मतदान केलेस म्हणजे काय, असे आपणास धमकावण्यास आले. त्यावेळी आपण वस्तुस्थिती कथन केली असता, पत्रकाराने मतदान केलेच पाहिजे असा शासननिर्णय आहे का, असल्यास तो दाखव. तरच आम्ही तुझ्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेऊ, असेही सांगितले. वाडीतील लोकांच्या दबावाखाली बळी पडून मच्छिमार समाजाने संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकल्यामुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे. आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरील व्यक्तींच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)