शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी रक्त सांडू !

By admin | Updated: April 7, 2017 00:16 IST

कांदळगाव ग्रामस्थ; सर्जेकोट-मिर्याबांदला पाणी नाही

मालवण : कांदळगाव गाव तहानलेला आहे. स्थानिक नागरिकांना पाणी मिळत नसतानाही दुसऱ्या गावाला कोणत्याही परिस्थितीत पाणी पुरवठा करू देणार नाही. २०१० साली ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यानंतर योजना बासनात गुंडाळण्याची कार्यवाही शासनाकडून वरवर करण्यात आली. ग्रामस्थांचा विरोध व ग्रामसभेचा ठराव झुगारून जबरदस्तीने नळपाणी योजनेचे काम सुरु केले, तर पाण्याच्या थेंबासाठी रक्त सांडू, पण गावातून पाण्याचा एकही थेंब दुसऱ्या गावाला देणार नाही, असा इशारा ग्रामसभेत ग्रामस्थांनी दिला. कांदळगाव गावाची विशेष ग्रामसभा येथील प्राथमिक शाळेच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी उमेश कोदे, सरपंच बाबू राणे, जिल्हा परिषद सदस्य सरोज परब, पंचायत समिती सदस्या सोनाली कोदे, माजी सरपंच उमदी परब, निकिता कदम, वैभव राणे, भाग्यश्री डिचोलकर, ग्रामसेवक ए. बी. पेढे यांच्यासह राजेंद्र कोदे, राजेंद्र कदम, विकास आचरेकर, राजन लाड आदी ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.सभेत कांदळगावचे पाणी सर्जेकोट मिर्याबांद गावाला देण्यासाठी साकारण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेला कांदळगाव ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून योजना साकारण्यास आल्यास न्यायालयीन लढा लढण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामसभेच्या निर्णयाच्या प्रती आमदार, खासदार, जलसंपदामंत्री, पाणीपुरवठामंत्री यांना पाठविण्यात याव्यात, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.