शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा विजेता

By admin | Updated: April 20, 2015 00:12 IST

ड्रॉप रो बॉल स्पर्धा : सिंधुदुर्ग दुसऱ्या स्थानी

सांगली : आक्रमकता आणि वेगाचे गणित जमवत अनुभवी सांगली जिल्हा संघाने प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवून राज्यस्तरीय ड्रॉप रो बॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सिंधुदुर्गला दुसऱ्या, तर कोल्हापूर जिल्ह्यास तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. बांबवडे (ता. पलूस) येथील गुरुकुल आविष्कार शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली. राज्यभरातील तीनशेपेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. उद्घाटन जितेंद्र संकपाळ यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते झाले. नामदेव शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी जी. ए. कॉलेजचे युआर शुभम जाधव, उद्योजक भाग्योदय डोंबे, शशिकांत पाटील, जयवंत पवार, दीपक पाटील, विजय मोहिते, राहुल पाटील, सुधीर आदाटे उपस्थित होते. स्पर्धेचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अंतिम निकाल असा : सबज्युनिअर गट : मुले : सिंगल : प्रतीक फोटे (कोल्हापूर), अवधूत साळुंखे (सांगली), सिद्धेश शिर्के (सिंधुदुर्ग). मुली : साक्षी पाटील (सिंधुदुर्ग), आकांक्षा पाटील (सांगली), प्रज्ञा दाभाडे (सातारा). डबल प्रकार : ऋषिकेश पवार व कुणाल रावळ (सांगली), कुणाल लाड व साहील जाधव (रत्नागिरी), आदित्य घाटगे व प्रशांत पाटील (सिंधुदुर्ग). मुली : प्रज्ञा दाभाडे व काजल दाभाडे (सातारा), आकांक्षा पाटील व शिवाणी पाटील (सांगली), कोमल माने व साक्षी पाटील (सातारा). ट्रीपल प्रकार : अवधूत साळुंखे, प्रज्ज्वल काळे व शेखर शेटे (सांगली).सीनिअर गट मुले : सिंगल : इम्रान शेख, हेमंत शिर्के, तुषार पाटील. डबल : विकास वायकर व जमीर शेख (अहमदनगर), शुभम गवळी व स्वप्निल जगताप (कोल्हापूर), कुंडलिक कुंपी व मेहबूब शेख (सातारा). ट्रीपल : ज्ञानेश्वर शिंदे, करण पाटील व करण नायकवडी (सांगली), किरण लेंडवे, विजय फाटे व सागर लेंगरे (सोलापूर), अक्षय सोनवणे, लिनेश लकडे व रोहित सोनवणे (जळगाव). पंच म्हणून धनेश म्हस्के, एस. दत्ता व संदीप लंबे यांनी काम पाहिले. राष्ट्रीय स्पर्धा भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)