शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सामंत यांनी प्रतिमा तपासावी

By admin | Updated: June 6, 2016 00:52 IST

बाबा मोंडकर : राजकीय नेत्यांना टार्गेट करू नये

मालवण : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांना ‘विषारी साप’ असे म्हणणे निंदनीय आहे. राजन तेली हे आपले गुरू आहे, असे त्यावेळी भाषणातून दत्ता सामंत यांनी सांगितले होते. त्यामुळे गुरूला विषारी साप संबोधणे हास्यास्पद आहे. सामंत यांनी भाजपच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा पक्ष संघटनावाढीसाठी प्रयत्न करावेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेली जिल्ह्याची जबाबदारी सांभाळताना इतर राजकीय नेत्यांना टार्गेट करू नये. आधी त्यांनी स्वत:ची प्रतिमा तपासून पहावी, अशी टीका भाजप मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केली आहे.येथील भाजप कार्यालयात पत्रकारांशी मोंडकर यांनी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी सामंत यांनी तेली यांना ‘विषारी साप’ म्हटले होते. या विधानाचा मोंडकर यांनी चांगलाच समाचार घेतला. गेल्या विधानसभा निवडणुकीत सामंत यांच्या घुमडे गावासह अन्य काही प्रमुख केंद्रांवर काँग्रेस पिछाडीवर होती. याचा अभ्यास करून सामंत यांनी टीका करावी. नारायण राणे यांच्या प्रचाराला सामंत यांनी किती वेळ दिला याचे त्यांनी आत्मचिंतन करावे, असेही मोंडकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा चिटणीस आप्पा लुडबे, शहर अध्यक्ष बबलू राऊत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सी-वर्ल्ड सत्यात उतरविणारमोंडकर म्हणाले, भाजप सरकार हे स्वप्ने दाखवत नाही तर स्वप्ने सत्यात उतरवते. गेल्या दोन वर्षांत केंद्रात व राज्य सरकारच्या माध्यमातून लोकहिताचे निर्णय घेतले आहे. महत्त्वाकांक्षी सी-वर्ल्ड प्रकल्प साकारण्याबाबत भाजपा सरकारने गतिमान हालचाली सुरूकेल्या आहेत. काही भूधारकांनी जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे. येत्या काही कालावधीत सी-वर्ल्ड स्वप्न राहणार नसून सत्यात उतरणार आहे. येणाऱ्या निवडणूक काळातही भाजप जोमाने काम करणार असून, अपेक्षित निकालही प्राप्त होईल.