शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खाकी वर्दीतल्या देवाला सलाम रं; गजरातून कार्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:20 IST

सिद्धेश आचरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : खाकी वर्दीशी इमान असलेल्या पोलिसांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कायदा सुव्यवस्था बिघडू नये याच्या प्रयत्नात असणाऱ्या पोलिसांना साधा कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यायला मिळत नाही. मात्र, याच पोलिसांच्या ‘खाकी’मध्ये बुवा समीर कदम यांना देवाचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या जीवनावर हरिनामातून ...

सिद्धेश आचरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : खाकी वर्दीशी इमान असलेल्या पोलिसांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कायदा सुव्यवस्था बिघडू नये याच्या प्रयत्नात असणाऱ्या पोलिसांना साधा कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यायला मिळत नाही. मात्र, याच पोलिसांच्या ‘खाकी’मध्ये बुवा समीर कदम यांना देवाचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या जीवनावर हरिनामातून प्रकाश टाकत भजन क्षेत्रात घातलेल्या नव्या पायंड्याचे स्वागत होत आहे.मालवण पोलीस वसाहतीतील सार्वजनिक गणेशोत्सव गेले १८ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.गणेशोत्सवानिमित्त पोलीस वसाहत व कर्मचारी यांच्यावतीने दरवर्षी डबलबारी भजनाचा सामना आयोजित केला जातो.यावर्षी पोखरण (ता. कुडाळ) येथील श्री लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाचे बुवा समीर कदम आणि बापर्डे (ता. देवगड) येथील श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप नाईकधुरे यांच्यात हा डबलबारी सामना संगीत मैफिल आणि बतावणीत चांगलाच रंगला. त्यात गुरू-शिष्य असलेल्या गजानन देसाई आणि योगेश सामंत या सुप्रसिद्ध पखवाज वादकांची साथ लाभल्याने डबलबारीच्या सांगतेपर्यंत दर्दी रसिक दाद देत होते.बुवा कदम व बुवा नाईकधुरे यांनी पोलिसांच्या यशस्वी कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढताना त्यांच्या देशसेवेच्या कार्यालाही आपल्या भजनातून सलाम केला.बुवा संदीप नाईकधुरे यांनी गोड आवाजात भजनाला प्रारंभ केला. नाईकधुरे यांनी पोलीस हे साक्षात देवाचा अवतार आहेत. पोलिसांमुळे समाजात ताठ मानेने फिरू शकतो. अनेकवेळा पोलीस जीव धोक्यात घालून गुन्हेगारांना गजाआड करतात. अशा कर्तव्यदक्ष पोलिसांना त्यांनी सलाम केला. तर बुवा समीर कदम यांनीही पोलीस दलाचे विशेष कौतुक करताना ‘एक गाव एक पोलीस’ या अभिनव उपक्रमाबाबत भजनातून जनजागृती केली.यावेळी विनोदाच्या माध्यमातून त्यांनी एक-दोन वेळा शाब्दिक चिमटेदेखील काढले.तुमच्याआमच्या भल्यासाठी...पोलीस हा जनतेसाठी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ सेवा बजावत असतो. पोलीस दलात रुजू झाल्यापासून तो आपला देह देशाला समर्पित करतो. अत्याचार, खून, हाणामाºया, आंदोलने, जाळपोळ, दंगल यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात पोलीस बांधव २४ तास गुंतलेले असतात. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असते. मात्र, त्याची वाहवा होताना दिसत नाही. याबाबत बुवा समीर कदम यांनी पोलिसांचा जीवनपट आपल्या गजरातून सादर करताना त्यांच्या कार्याची महती रसिकांपर्यंत पोहोचविली. ‘तुमच्या आमच्या भल्यासाठी, करतो हा काम रं! या या गर्दीतल्या, या खाकी वर्दीतल्या देवाला सलाम रं’ अशा शब्दांत पोलिसांच्या कार्याचा गौरव करताना लाख लाख सलाम केला.‘लोकमत’मधून भजन सांप्रदायावर सकारात्मक लिखाण केले जाते. हरिनामरुपी सेवेतून समाजप्रबोधन करण्याचा भजनी बुवांचा दृष्टिकोन लोकमतने कायम हेरला असून त्याचे चांगले वार्तांकन केले जाते. डबलबारी भजनात फोफावलेल्या अश्लीलतेला लोकमतने वाचा फोडली, असे बुवा संदीप नाईकधुरे व बुवा समीर कदम यांनी सांगत ‘लोकमत’चे विशेष कौतुक केले.