शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

देवगडात बनावट संजिवनीची विक्री

By admin | Updated: August 1, 2014 23:17 IST

आंबा कलमांसाठी वापर : कृषी विभागाचे दुर्लक्ष

पुरळ : आंबा कलमांना लवकर मोहोर येण्यासाठी कल्टार ही संजीवनी जुलै व आॅगस्ट महिन्यांमध्ये वापरली जाते. देवगड तालुक्यामध्ये कल्टार, बोल्टार, सेल्टार, थ्रीस्टार, एक्सस्टार, पॅक्लोजस्टार या संजीवनी वापरल्या जात असून बऱ्याच प्रमाणात परजिल्ह्यातील एजंट घरोघरी जाऊन व काही एजंटांमार्फत बनावट संजीवनी विक्री करीत आहेत. याकडे देवगड कृषी विभाग दुर्लक्ष करीत असून बनावट संजीवनी विक्रेत्यांना एकप्रकारची चालनाच देत आहे.बनावट रासायनिक खते व सेंद्रीय खते, बनावट भात बियाणे, बनावट किटकनाशके याचबरोबर आता बनावट कल्टार या संजीवनीची विक्री केली जात आहे. विशेषत: बोल्टार, थ्रीस्टार या कंपन्यांची जशीच्या तशी छपाई व बाटलीचा आकार बनावट कंपन्या करून या संजीवनी विकल्या जात आहेत. तालुक्यामध्ये पंधरा वर्षापूर्वी कल्टार या कंपनीचे संजीवनी वापरायचे. यानंतर अनेक कल्टार संजीवन्या बाजारामध्ये आल्या आहेत. परजिल्ह्यातील एजंट हे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बनावट कल्टार संजीवनी शेतकऱ्यांना खरेदी करण्यास प्रवृत्त करून माफक दरात म्हणजेच बाटलीवरील छपाई किंमतीच्या निम्मे किंमतीने विक्री करीत आहेत. युरोपियन राष्ट्रांमध्ये हापूस आंब्याला जी बंदी घालण्यात आली आहे. त्या बंदीला बनावट कल्टार हेही एक कारण असू शकते. कारण नको असलेले घटक आंबा कलमांना मिळत असतील आणि यामुळे कलमांचा समतोलपणा बिघडून त्याचा परिणाम फळांवर होत आहे. आंबा कलमांना बनावट खते, किटकनाशके याबरोबर कल्टार या संजीवनीचा वापर होत राहिल्याने भविष्यामध्ये देवगड हापूस पिकांवर विपरीत परिणाम होऊन देवगड हापूस आंब्याची पत घसरून आंबा पीकही धोक्यात येऊ शकते. कृषी विभाग मात्र आपले कार्य पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून एखाद्या वार्षिकाप्रमाणे मेळावे घेऊन आपले कार्य पार पाडत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी कोणीही करीत नसल्याने येथील शेतकरी एकाएकी पडला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने तेथील लोकप्रतिनिधी नेहमीच उभे असतात. विधानसभा लोकसभेमध्ये आवाज उठवतात. मात्र, आंबा बागायतदारांच्या बाजूने कुठलाही लोकप्रतिनिधी नसल्याने या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बनावट या नावाने बागायतदारांना ग्रासले आहे. तर दलालांच्या मक्तेदारीने आंबा बागायतदार होरपळले आहेत. यामुळे आंबा बागायतदार पूर्णत: कोलमडून गेला आहे. (वार्ताहर)