शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित शिक्षण संस्थांचे वेतन आता ‘आॅनलाईन’च

By admin | Updated: April 30, 2015 00:28 IST

जूनपासून होणार अंमलबजावणी

असगोली : राज्यातील सर्व अनुदानित महाविद्यालये, विद्यापीठ कर्मचारी अनुदानित संस्था, तंत्रनिकेतन, आयटीआयमधील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे जून २०१५ पासूनचे वेतन सरकारच्या खात्यातून वितरीत केले जाणार आहे. याबाबतचा अध्यादेश सरकारने ७ मार्च रोजी जारी केला आहे. त्यानुसार उच्च तंत्र व व्यावसायिक शिक्षण विभागातील प्राध्यापक, निदेशक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. वेतन देयके तयारी करण्यासाठी ‘सेवार्थ’ प्रणाली विकसीत केली आहे. शासनाने सर्व अनुदानित महाविद्यालये व विश्व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची याद मागवली आहे. ही सूची महाराष्ट्र शासनाच्या सर्व्हरला जोडली जाणार आहे. सर्व्हरला कर्मचाऱ्याचे नव व नियुक्ती कोणत्या आधारावर झाली आहे, याची माहिती जोडली जाणार आहे. शासनाने जेवढ्या पदांना मान्यता दिली आहे तेवढीच पदे जोडली जाणार आहेत.यापूर्वी अनुदानित महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांची वेतनाची माहिती कोषागार कार्यालयाला जात होती. त्यानंतर कोषागारामार्फत पगाराचा धनादेश स्टेट बँकेला मिळत होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध बँकातील खात्यात वेतन जमा करण्यात येत होेते. त्यामध्ये बराचवेळ खर्च होत होता. सरकारचा निधी बँक अधिकारी आपल्या मर्जीनुसार वापरत असत. त्यामुळे सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाच्या खात्यातून देण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)