शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘अपंग-अव्यंग’ योजना नावापुरतीच

By admin | Updated: November 27, 2015 00:11 IST

दीड वर्षांपासून प्रस्ताव धूळ खात : संबंधित व्यक्तींच्या समाजकल्याण विभागात फेऱ्या

गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी  -अपंग व्यक्तींना कौटुंबिक जीवन योग्य प्रकारे जगता यावे. त्यांच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनाने आंंतरजातीय विवाह आर्थिक साहाय्य योजनेच्या धर्तीवर अपंग-अव्यंग व्यक्ती विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली. मात्र, ही योजना जिवंत ठेवण्यासाठी निधीची तरतूदच केली नसल्याने गेल्या दीड वर्षात एकाही जोडप्याला याचा लाभ देता आलेला नाही. गेल्या दीड वर्षापासून ते प्रस्ताव समाजकल्याण विभागात धूळ खात पडलेले असून, या योजनेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. संबंधित जोडपी मात्र समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारून थक ली आहेत.अपंगांकरिता विविध कल्याणकारी योजना शासनाकडून राबवण्यात येत आहेत. अपंगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा भाग म्हणून अपंग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन जगता यावे, यासाठी अपंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याप्रमाणेच अपंग-अपंगत्व असलेल्या विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी शासनाने १४ जून २०१४ रोजी निर्णय जारी करत ही योजना सुरू केली. यामध्ये किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी सुदृढ असलेल्या व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यांना रोख रक्कम २५ हजार रुपयेचे बचत प्रमाणपत्र, २० हजार रुपये रोख स्वरूपात, ५४०० रुपयांचे संसारोपयोगी साहित्य व ५०० रुपये स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी असे एकून ५०,००० रुपये देण्याची तरतूद आहे. विविध कारणांमुळे अपंग झालेल्या व्यक्तींना बहुतांशवेळा उपेक्षितांचे जीवन जगावे लागते. सर्वसामान्यांप्रमाणे त्यांना वागणूक मिळत नाही. अपंग व्यक्तीच्या उत्कर्षासाठी शासनाने अनेक योजना सुरू केलेल्या पहावयास मिळतात. मागच्या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी झाली तर एका अर्थाने योजना यशस्वी झाली असे वाटते. समाजकल्याण विभागाने अपंग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्य देणारी योजना सुरू केली. मात्र, ही योजनाच कमजोर झाल्याचे दिसून येत आहे. शासनाने ही योजना मोठ्या उत्साहाने सुरू केली. मात्र, या योजनेसाठी तरतूदच केली नसल्याने जिल्ह्यातील संबंधित अपंग लाभार्थी, अपंग जोडपी या आर्थिक लाभापासून उपेक्षितच राहिली आहेत.जिल्ह्यात या योजनेची काही प्रमाणात प्रचार, प्रसिद्धी झाली. त्यानंतर जिल्ह्यातील कित्येक अपंग जोडप्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाले. प्रस्तावांचा विचार करता त्या अनुषंगाने लाखो रुपयांच्या अनुदानाची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, निधीची उपलब्धता नसल्याने गेल्या दीड वर्षापासून या संबंधित जोडप्यांना या योजनेचा लाभ देता आला नाही. प्रस्तावही समाजकल्याण विभागाकडे धूळ खात पडलेले आहेत. शासनाने अपंगांना अर्थसहाय्य करण्याची योजना सुरू केली. याबाबत आधी शासनाचे अभिनंदन करतो; मात्र या योजनेसाठी तुटपुंजा निधी शासन उपलब्ध करून देत असेल तर ही संतापजनक घटना आहे, असे एका लाभार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (प्रतिनिधी)कार्यालयात फेऱ्या मारून जोडपी थकलीअपंग-अव्यंग या शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाभरातून जोडप्यांनी समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव केले. मात्र, दीड वर्ष लोटले तरी या प्रस्तावापैकी एकाही जोडप्याला समाजकल्याण विभागाकडून लाभ देण्यात आलेला नाही. हे पाहण्यासाठी जोडपी समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारून थकली आहेत. शासनस्तरावर आम्हाला निधी उपलब्ध न घाल्याने जिल्हाभरातून आलेले प्रस्ताव निधीअभावी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. निधी उपलब्ध होताच तत्काळ त्यांना योजनेचा लाभ देता येणार आहे.- मिलिंद जाधव, समाजकल्याण अधिकारी विवाह झाल्यानंतर एका वर्षात प्रस्ताव करणे बंधनकारक आहे. ही योजना १७ जून २०१४ रोजी सुरू केल्याने या कालावधीत विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी ही योजना लागू आहे. हे पाहता या योजनेला लेखाशीर्ष न मिळाल्याने ज्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे, अशा जोडप्यांना शासनाच्या नाकर्तेपणाचा फटका बसला आहे.