शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भक्तांसाठी एस. टी. सज्ज

By admin | Updated: September 13, 2015 22:17 IST

गणेशोत्सव : रत्नागिरी विभागाकडून दररोज १०० गाड्या, मुंबईकर कोकणात दाखल

रत्नागिरी : गणपतीबाप्पांच्या आगमनास केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. नोकरी-व्यवसायानिमित्ताने मुंबईत स्थिरावलेली मंडळी गणेशोत्सवास आवर्जून गावी परततात. त्यामुळे मुंबईकरांना आणण्यासाठी एस. टी. प्रशासन सज्ज झाले आहे. एकूण २००५ जादा गाड्यांतून मुंबईकर गणेशोत्सवासाठी गावी येणार आहेत.मुंबई, ठाणे, पालघर येथून रत्नागिरी जिल्ह्यात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. दि. १२ रोजी १८ गाड्या तर दि. १३ रोजी ६८ जादा गाड्या मुंबईकरांना घेऊन जिल्ह्यात आल्या आहेत. दि. १४ रोजी ३०७, दि. १५ रोजी १३३०, तर दि. १६ रोजी २७५ जादा गाड्या येणार आहेत. सर्वाधिक गाड्या १५ रोजी येणार आहेत.या व्यतिरिक्त रत्नागिरी विभागाकडून दररोज १०० गाड्या सोडण्यात येत असून, त्यात आणखी ८० गाड्या गणेशोत्सवात सोडल्या जाणार आहेत. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांसाठी एस. टी. प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)दिशादर्शनासाठी कर्मचारी तैनात --मुंबईतून कोकणात येण्यासाठी जळगाव, धुळे, अमरावती, विदर्भ येथून चालकांसहित जादा गाड्या मागविण्यात येतात. नवीन चालकांना मार्ग माहित नसल्यामुळे खास दिशादर्शनासाठी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय कशेडी ते संगमेश्वर व संगमेश्वर ते राजापूर मार्गावर दोन गस्तीपथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय विभागीय कार्यालयातील अधिकारीवर्ग महामार्गावर खास लक्ष ठेवणार आहे. अपघात होऊ नये यासाठी गणेशोत्सव कालावधीत महामार्गावर अवजड वाहतूक बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल.दुरूस्तीपथक कार्यरत--एस. टी. बंद पडून भाविकांचे हाल होऊ नयेत यासाठी महामंडळातर्फे खास दुरूस्तीपथक महामार्गावर कार्यरत ठेवण्यात येणार आहे. संगमेश्वर येथे दुरूस्तीपथक तर चिपळूणात क्रेन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कशेडी येथे चेकपोस्ट तर संगमेश्वर व चिपळूण येथे खास दिशादर्शकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जाताना मार्गात बदल --मुंबई, ठाणे, पालघर येथून येणाऱ्या गाड्या राष्ट्रीय महामार्गावरून येणार असल्या तरी जातानाचे मार्ग बदलण्यात आले आहेत. महामार्गावर येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांची गर्दी होवून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे जाताना काही गाड्या अणुस्कूरा घाटमार्गे, तर काही गाड्या आंबाघाटमार्गे तर काही गाड्या कोयना-पाटणमार्गे वळविण्यात आल्या आहेत. स्वच्छतेबाबत सूचना --बसस्थानके, स्थानकाच्या आवारातील प्रसाधनगृहे तसेच शौचालयांच्या खास स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय बसस्थानकातील पंखे, विजेचे दिवे सुस्थितीत ठेवण्याबाबत, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच उपाहारगृहात अधिक खाद्यपदार्थ ठेवण्याची सूचनादेखील एस. टी. प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एस. टी. प्रशासनाने स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीही विशेष भर देण्याचे ठरविले आहे.एस. टी.च्या संख्येत वाढ--गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गाड्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. २०१३ साली मुंबई, ठाणे, पालघर येथून १७११ गाड्या आल्या होत्या. २०१४ मध्ये १९१३ गाड्या आल्या होत्या. यावर्षी २००५ गाड्या येणार आहेत. विसर्जनानंतर मुंबईकरांची परतण्याची घाई असते. २१ रोजी विसर्जन झाल्यानंतर मागणीप्रमाणे जादा गाड्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे. परतीसाठी ६५० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. हा प्रतिसाद उत्तम असल्याचे मानले जात आहे.बसस्थानकापर्यंत गाड्या --अनेक ठिकाणी रेल्वेस्थानके व बसस्थानकांमध्ये कमालीचे अंतर आहे. बसस्थानकापर्यंत येण्यासाठी प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागतात. अनेकवेळा वाहनेही उपलब्ध होत नाहीत. झालीच तर ती अवाच्या सव्वा पैसे उकळतात. यात प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी रेल्वेच्या वेळेत रेल्वेस्थानक ते बसस्थानकापर्यंत खास बस सोडण्यात येणार आहेत. शिवाय ‘डेम’ूने येणाऱ्या प्रवाशांसाठी चिपळूण रेल्वेस्थानक ते बसस्थानकापर्यत गाड्या सोडण्यात येणार आहेत.गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या विचारात घेता एस. टी. प्रशासनाकडून तशा जास्तीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खबरदारीचा पर्याय म्हणून महामंडळाने महामार्गावर गस्तीपथक, चेकपोस्ट, नियंत्रण कक्ष सुविधा उभारली आहे. कर्मचाऱ्यांचे फिरते गस्तीपथक अहोरात्र महामार्गावर तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय आगारनिहाय पालक, अधिकारीदेखील नियुक्त करण्यात आले आहेत.-के . बी. देशमुख, विभागनियंत्रक, रत्नागिरी विभाग.