चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे विद्यार्थी विभागाचे ५५वे महाराष्ट्र राज्यकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थी विभागात सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कला महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी आपल्या कामातून ठसा उमटविला आहे. राज्य पातळीवर सर्व दृककला एकत्रित प्रदर्शित होतात. शासनाच्या या उपक्रमांमुळे तरुण चित्रकारांना या कला जगतात संजीवनीच मिळते. हा पुरस्कार महाराष्ट्रातील इतर कोणत्याही खासगी संस्थेच्या पुरस्कारापेक्षाही उत्तेजन देणारा असतो. यावर्षी कोकणचा सुपुत्र अमोल हरेकर (शिल्प व प्रतिमानबंध कला) या विभागात त्याने चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. एटीडी वर्गातील गणेश रावणंग याला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. आपल्या कलाकृतीतून परीक्षकांची मने जिंकणारे रोहन पंडित, रोहित पोवार, विश्वजित कदम, कौस्तुभ सुतार, तन्वी इंदुलकर (मूलभूत अभ्यासक्रम), प्रथमेश गावकर, प्रणिता सकपाळ, कौस्तुभ चव्हाण, स्नेहांकित पांचाळ, चारुदत्त धुमाळ (कला शिक्षक पदविका विभाग), वैभव निर्मळ, स्वाती शिंगडे, संदेश मोरे (रेखा व रंगकला विभाग), अमोल हरेकर सूरज चांदोरकर, नितीश नार्वेकर, निखिल कोळंबकर (शिल्प व प्रतिमानबंध कला) या विद्यार्थ्यांनी गुणगौरव मिळवला आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा निकम, सेक्रेटरी अशोक विचारे, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, युगंधरा राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव यांनी सत्कार केला. (प्रतिनिधी)
राज्य कला प्रदर्शनात सह्याद्री आर्ट स्कूलने उमटवला ठसा
By admin | Updated: January 2, 2015 23:59 IST