शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

साहिल कालसेकर अखेर गजाआड चिपळूण पोलिसांची कामगिरी

By admin | Updated: July 30, 2015 00:05 IST

तिसऱ्या आरोपीला पकडून हॅट्ट्रिक साधली आहे

चिपळूण : कुख्यात गुंड साहिल कालसेकर याला रात्री दीडच्या दरम्यान चिपळूण पोलिसांनी देवरूख येथे सापळा लावून पकडले. पळून गेल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याच्याकडून चाकू व दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. चिपळूण पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पळालेल्या तिसऱ्या आरोपीला पकडून हॅट्ट्रिक साधली आहे.रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साहिल अजमल कालसेकर या कुख्यात गुंडाने बुधवारी (दि. १५ जून) रुग्णालयातून पलायन केले होते. याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, साहिलला शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेची सूत्रे त्यांनी चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्याकडे दिली होती. त्यानुसार मकेश्वर यांनी पाठलाग सुरू केला होता.जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर साहिल बेलबाग येथे गेला. त्यानंतर दोन दिवस त्याचा मुक्काम रत्नागिरी येथे होता. तेथून तो मुंबईला गेला. परत देवरूख येथे आला व पुन्हा मुंबई येथे गेला होता. मुंबईहून परत तो देवरूख येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. साहिलच्या पाठीवर असलेल्या पोलीस निरीक्षक मकेश्वर यांना साहिलची माहिती मिळत होती; परंतु तो सतत मोबाईलचे सीमकार्ड बदलत होता. त्याची ठिकाणे सतत बदलत होती. एखाद्या ठिकाणावर पोलीस पोहोचले की, तो तेथून गायब असायचा. देवरूख येथील गिरीराज हॉटेलजवळ साहिल येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलीस निरीक्षक मकेश्वर, सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, हवालदार अमोल यादव, गगनेश पटेकर, उमेश भागवत, संदीप नाईक, राजेश चव्हाण, राजू गाडीवट्ट, विजय खामकर व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे रमीज शेख यांनी सापळा रचला होता. (पान ८वर)(पान १ वरुन) या कामगिरीत मकेश्वर यांना रमीज शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय अनेक नागरिकांनीही त्यांना हस्ते परहस्ते मदत केली. रात्री १.३०च्या सुमारास हॉटेल गिरीराजजवळ साहिल मोबाईलवर बोलत होता. या दरम्यान टेम्पो ट्रॅव्हलरमधून साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी त्याला घेरले व शरण येण्यास सांगितले. परंतु, सातत्याने पोलिसांवर हल्ला करण्याची सवय असलेल्या साहिलने नेहमीप्रमाणे पोलिसांच्या दिशेने चाकू भिरकावला. सुदैवाने तो चाकू कोणाला लागला नाही आणि पोलिसांनी साहिलला रंगेहाथ पकडले. रात्रीच त्याला चिपळूण येथे आणण्यात आले.साहिलकडून चाकू व दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. साहिलला पकडण्यासाठी पोलिसांनी स्थानिक पातळीवर घरझडत्या घेतल्या. मुंबईतील डोंगरी, दादर, मिरारोड, ठाणे येथेही शोध घेतला. परंतु, तो सापडत नव्हता. दरम्यान, काही काळ तो मार्गताम्हाणे व पनवेल परिसरात काहींना आढळला होता. १५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर साहिल पोलिसांच्या हाती सापडला. साहिलला अटक झाल्याचे समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे जिल्हाभरातून कौतुक करण्यात आले. साहिलला दुपारी पोलीस निरीक्षक मकेश्वर यांनी स्वत: रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)पोलिसांना चकविण्यासाठी बदलला लूक रत्नागिरी ते मुंबई, मुंबई ते देवरूख असा प्रवास करताना साहिल पनवेल, मुंबके व मार्गताम्हाणे येथेही गेला होता. खेड, सावर्डे मोहल्ला व संगमेश्वर परिसरात या काळात चोरीला गेलेल्या मोटारसायकलीही त्यानेच चोरल्या असाव्यात. मुंबकेहून दुचाकीने तो सावर्डे येथे आला. तेथे पेट्रोल संपल्याने ती गाडी तेथेच सोडून दुसरी दुचाकी घेऊन तो देवरूखकडे गेला होता. साहिलने आपला नेहमीचा लूकही बदलला आहे.