शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

सचिन गावकरचे कुडाळात आगमन

By admin | Updated: January 16, 2015 23:47 IST

सायकलवरून भारतभ्रमण : मानसिक आरोग्याचा देतोय संदेश

कुडाळ : ‘मानसिक आरोग्य सर्वांसाठी’ हा उद्देश जोपासून इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या संघटनेचे सचिन गावकर यांनी भारत परिभ्रमणास सायकलवरून सुरुवात केली. काल, गुरुवारी त्यांचे कुडाळात आगमन झाले. २२३ दिवसांत १४ हजार किलोमीटरचा प्रवास २५ राज्यांतून करणार आहेत.‘मानसिक आरोग्य सर्वांसाठी’ हा उद्देश जोपासून आयपीएच ही संस्था गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहे. मानसिक आरोग्याची गरज आहे का? ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी हा सायकल भ्रमणमधून जनजागृतीचा हेतू आहे. आज गावकर यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. रुपेश धुरी, डॉ. मंदार कालेकर आदी उपस्थित होते. गावकर म्हणाले की, ठाणे येथे जे हॉस्पिटल आहे ते मेंटल हॉस्पिटल म्हणून परिचित होते. गेली २५ वर्षे डॉ. आनंद नाडकर्णी व त्यांच्या टीमने या ठिकाणी काम करून चित्र बदलले. गेली दहा वर्षे मी संस्थेचा सभासद आहे. संपूर्ण भारतात मानसिक संकल्पना काय आहे? याचा आढावा घेत त्यावर ४० मिनिटांची डॉक्युमेंटरी बनविणे, शाळा कॉलेजमध्ये तरुणांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचावी हा हेतू जोपासून सायकलभ्रमण सफारीला सुरुवात केली.१४ हजार किलोमीटरसायकलभ्रमण करताना २५ राज्यांतून १४ हजार कि.मी. प्रवास करताना हा प्रवास २२३ दिवसांत पूर्ण करणार आहे. ७ जानेवारीला ठाणे येथून प्रवासाला सुरुवात झाली. आज कुडाळात आगमन झाले. या प्रवासात पुणे येथील मुक्तांगणला भेट, सातारा येथे एमएसडब्ल्यू कॉलेजच्या मुलांशी संवाद, अंनिसचे संपादक नरेंद्र दाभोलकर यांच्या परिवर्तन केंद्रास भेट.सांगली येथे डॉक्टर तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा आदींतून सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. माझा प्रवास विचारांना चालना देणारा आहे. प्रवासाचे टप्पेठाणे ते कन्याकुमारी १७६३ किमी २२ दिवस ५ राज्येकन्याकुमारी ते कलकत्ता २४४० किमी ३६ दिवस ३ राज्येकोलकाता ते बडोदरा ३४३० किमी ७२ दिवस ८ राज्येबडोदरा ते मनाली २०६९ किमी ३१ दिवस ६ राज्येमनाली ते जम्मू ११८७ किमी २७ दिवस १ राज्यजम्मू ते ठाणे २८४९ किमी ३६ दिवस २ राज्ये असे आहेत. आतापर्यंत ८५०० किमी अनुभव आल्याचे सांगितले.सचिन गावकर यांनी याअगोदरही जनहितार्थ उपक्रमाच्यादृष्टीने ७ हजार ५०० किलोमीटरचे अंतर सायकल सफारीने पार केले असून आता मानसिक आरोग्य सर्वांसाठी हा संदेश देशात पसरावा या उद्देशाने संपूर्ण देशभर सायकल सफर सुरुवात केली आहे.- डॉ. रुपेश धुरी, मानसोपचारतज्ज्ञ, कुडाळ