शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: August 11, 2014 22:39 IST

रत्नागिरी आमसभा : अधिकाऱ्यांची अनुपस्थितीसह घरकुल योजनेच्या हप्त्यावर गाजावाजा

रत्नागिरी : आमसभेला अनुपस्थित राहणाऱ्या एस. टी.च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. तसेच इंदिरा आवास घरकुल योजनेतून घरकुलाचे काम पूर्ण होऊनही अनेकांचा पहिला हप्ता सोडण्यात न आल्याने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिली.पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुक्याच्या या आमसभेमध्ये जिल्हा परिषद शिक्षण सभापती सतीश शेवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरीष जगताप, पंचायत समिती सभापती अनुष्का खेडेकर, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, विजय सालीम, सदस्या विनया गावडे, पंचायत समिती सदस्य मंगेश साळवी, प्रकाश साळवी, नदीम सोलकर, महेंद्र झापडेकर व अन्य सदस्य उपस्थित होते.शासन जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी स्वायत्त संस्थांच्या अधिकारांवर गदा आणू पाहत आहे. नुकतेच कृषी विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या योजना शासनाने राज्य पातळीवरुन देण्यास प्रारंभ केला आहे. दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्त अधिकार प्राप्त करुन दिले आहेत. मात्र, त्यांची गळचेपी केली जात आहे. पालकमंत्र्यांनीही स्वायत्त संस्थांना निधी देताना स्वातंत्र्यासह द्यावा, असा टोला सदस्य उदय बने यांनी पालकमंत्र्यांना दिला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देताना त्यातून कामे सूचविण्याचे अधिकारही तेथील जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांना राहतील, असा ठराव करण्यास सांगितले. नाखरे येथे इंदिरा आवास घरकुल योजनेतून घरकुलाचे काम पूर्ण होऊनही पहिल्या टप्प्याचीसुध्दा रक्कम मिळालेली नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत. हप्ते मिळणार नसतील तर कशाला योजना राबवायची, असा प्रश्नही येथे उपस्थित करण्यात आला. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. इंदिरा आवास योजनेतून निवडलेल्या गावातील सर्वांना घरे दिल्याशिवाय पुढील गाव घेऊ नये, असा निकष आहे.शासनाचा निधी अत्यल्प असल्यामुळे एक गाव पूर्ण होण्यास विलंब लागून ज्याला खरोखरच निधी आवश्यक आहे. त्याच्यापर्यंत निधी पोहोचायला अनेक वर्षे जातील. त्यामुळे हे अनुदान गावनिहाय न देता ज्याला आवश्यकता आहे, त्यांना प्राधान्याने द्यावे. अशी सूचना बने यांनी मांडली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांची सूचना शासनापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले.शासकीय शाळांना व्यावसायिक वीजदर लावण्यात येतो. महावितरणच्या प्रतिनिधींनी व्यावसायिक व घरगुती या दोघांमधील मध्य साधून शाळांना वीजदर लागू करण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर प्राथमिक शाळांना शासनाकडून मिळणारे अनुदान आणि भाडे अनेक वर्षांपासून थकीत आहे. ते त्वरित मिळावे, अशी मागणी सभापती शेवडे यांनी केले.गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली. (शहर वार्ताहर)-स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार अबाधित ठेवा.-गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरावेत.-कृषी विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या योजना शासनाने राज्य पातळीवरुन देण्यास केला प्रारंभ.-नाखरे येथे इंदिरा आवास घरकुल योजनेतून घरकुलाचे काम पूर्ण होऊनही पहिल्या टप्प्याचीसुध्दा रक्कम मिळाली नसल्याची तक्रार.-अनुदान मिळणार नसतील तर कशाला योजना राबवायची? नागरिकांचा -इंदिरा आवास योजनेतून निवडलेल्या गावातील सर्वांना घरे दिल्याशिवाय पुढील गाव न घेण्याचा निकष.