शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

‘ग्रामीण रोहयो’ला प्रतिसादच नाही

By admin | Updated: May 15, 2015 00:02 IST

राजापूर तालुका : शासनाच्या योजनेचा उडाला बोजवारा

राजापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांना चांगला प्रतिसाद नसल्याचे तालुक्यात चित्र दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेचा बोजवारा उडाला आहे.या योजनेसाठी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटातून शिवणे बुद्रुक, मिळंद, पन्हळेतर्फ सौंदळ, देवीहसोळ, धाऊलवल्ली व पडवे या गावांची मॉडेल गावे म्हणून निवड करण्यात आली. त्यानुसार निवडण्यात आलेल्या गावांनी २१३ प्रस्ताव सादर केले. त्यातील १७२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तर ४१ कामे अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. १७२ प्रस्तावांपैकी १०६ कामे अद्याप सुरुच झालेली नाहीत.शिवणेबुद्रुक गावातून २१ कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यातील १८ मंजूर कामांपैकी ७ कामे सुरु आहेत. मिळंदमधील ७३ प्रस्ताव आले होते. त्यातील ६९ मंजूर कामांपैकी १७ कामे सुरु आहेत. पन्हळेतर्फे सौंदळमधील १४ प्रस्ताव सादर झाले होते. त्यातील ११ मंजूर कामांपैकी ६ कामे सुरू आहेत. देवीहसोळमधील ३९ प्राप्त प्रस्ताव आले होते. त्यातील ३५ मंजूर कामांपैकी १८ कामे सुरू आहेत. धाऊलवल्लीतील ४१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातील २६ मंजूर कामांपैकी १३ कामे सुरू आहेत. पडवे गावातील २५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातील १३ मंजूर कामांपैकी ४ कामे सुरु आहेत. मात्र या योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत पंचायत समिती प्रशासनाला किती आस्था आहे, हेच दिसून येते.या कामामध्ये वैयक्तिक शौचालय सिंचन विहीर, जनावरांचा गोठा, शोष खड्डा खोदणे, गांडूळसहीत अन्यखतांची निर्मिती करणे, फळबाग लागवड आदी कामांचा त्यामध्ये समावेश आहे. तथापि मॉडेल गावे म्हणून निवडण्यात आलेल्या या गावांचीच कामे रखडली आहेत. परिणामी शासनाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे. (प्रतिनिधी)सहा जिल्हा परिषद गटातून शिवणे बुद्रुक, मिळंद, पन्हळेतर्फ सौंदळ, देवीहसोळ, धाऊलवल्ली व पडवे या गावांची मॉडेल गावे म्हणून निवड.निवडण्यात आलेल्या गावांनी केले २१३ प्रस्ताव सादर.१७२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तर ४१ कामे अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत.