शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

एक खिडकी योजना राबवा

By admin | Updated: November 14, 2014 23:19 IST

बाबा मोंडकर यांची मागणी : अनधिकृत गाईडबाबत लक्ष वेधले

मालवण : मालवणच्या पर्यटन व्यवसायात विशेषत: स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग या व्यवसायात अनधिकृत गाईड्स व एजंटचा धुमाकूळ वाढला असल्याने यामुळे वॉटर स्पोटर््स व्यावसायिक व त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांना नाहक तोटा सहन करावा लागत आहे. तसेच तालुक्यातील वायरी-तारकर्ली-देवबाग या रस्त्यावरून जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या अशा अनधिकृत गाईड्सकडून अडवून पर्यटकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ही गोष्ट गंभीर असून यासाठी बंदर विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयातून या गोष्टीवर चाप ओढणे गरजेचे आहे. तसेच हे प्रकार रोखण्यासाठी संबंधित अनधिकृत गाईड्स आणि वॉटर स्पोटर््स व्यावसायिक यांना बंदर विभागाने परवाने देऊन सर्वांना एका छत्राखाली आणून एक खिडकी योजना राबवावी अशी मागणी भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मालवण बंदर विभाग व पोलीस ठाण्याकडे केली आहे.मालवणातील पर्यटन विकास होत असतानाच विशेषत: वॉटर स्पोटर््स व्यवसायातील स्पर्धा आणि मार्केटींगमधील स्पर्धा वाढीस लागली आहे. अनधिकृत गाईड्समुळे ज्या अधिकृत वॉटर स्पोटर््स व्यावसायिकांकडून मिळणाऱ्या दर्जेदार सुविधांपासून पर्यटक वंचित राहतात. तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून येणाऱ्या पर्यटकांच्यासाठी सर्व सुविधांचे नियोजन केले जाते. त्यात वॉटर स्पोटर््स सुविधेचा समावेश आहे. दर्जेदार सुविधा पुरविण्याचा हॉटेल व्यावसायिकांचा मानस असतो. पर्यटकांकडून अ‍ॅडव्हान्स बुकींग केले जाते. मात्र, अनधिकृत गाईड्कडून कमी किंमतीत सुविधा देण्याचे आमिष दाखवून पर्यटकांना त्यांच्याकडे खेचले जाते. त्यावेळी पर्यटक अ‍ॅडव्हान्स बुकींग असतानाही हॉटेल व्यावसायिकांच्या हातावर तुरी देऊन नाहीसे होतात. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक व त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या अधिकृत वॉटर स्पोटर््स व्यावसायिक व संस्थांचेही नुकसान होते. त्यामुळे अशा गाईड्स अधिकृतरित्या एखाद्या पर्यटन संस्थेमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांना परवाने देणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या अनधिकृत वॉटर स्पोटर््स व्यावसायिकांनाही एक खिडकी योजनेखाली आणून सर्व व्यावसायिकांना समान दर निश्चित करून देणे आवश्यक आहे. यासाठी बंदर विभाग व पोलीस यंत्रणेच्या समन्वयातून सहकार्य आवश्यक आहे, असेही मोंडकर म्हणाले.यावेळी भाजपचे भाऊ सामंत, विलास हडकर तसेच वॉटर स्पोटर््स व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढणे आवश्यकयासाठी वॉटर स्पोटर््स व्यावसायिक, पर्यटन संस्था, बंदर विभाग, पोलीस यंत्रणा यांची एकत्रित बैठक घेऊन याप्रश्नी तोडगा काढणे आवश्यक आहे असेही मोंडकर यांनी सांगितले. यावर पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांनी आवश्यक नियमावलीचा कच्चा मसुदा तयार करा व त्याबाबत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांची भेट घ्या असे सुचविले. तसेच यात पोलिसांचे आवश्यक सहकार्य लाभेल असेही सांगितले.