शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

समुद्रातील दुर्मीळ प्रवाळ बेटांचे होणार संरक्षण

By admin | Updated: March 6, 2015 00:12 IST

सागरी पर्यटनाला फायदा : संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत उपक्रम

 संदीप बोडवे ल्ल मालवण सिंधुदुर्गातील सागरी प्रवाळ क्षेत्रांचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांंतर्गत महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे समुद्रात असलेल्या दुर्मीळ प्रवाळ बेटांचे संरक्षण केले जाणार आहे. ज्या ठिकाणी समुद्रात प्रवाळ बेटे नाहीत, परंतु त्यासाठी पोषक स्थिती आहे, अशा ठिकाणी ‘आर्टिफिशल रिफ’ व ‘कोरल ट्रान्सलोकेशन’ अर्थात कृत्रिम प्रवाळ बेटांवर प्रवाळांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. यासाठी सिंधुदुर्गच्या समुद्रात झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाकडून प्रवाळ क्षेत्रांचा अभ्यास सुरू झाला आहे. या अभ्यासातून येणाऱ्या निष्कर्षानंतर स्थानिकांच्या सहमतीने कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यानंतर निवडलेल्या क्षेत्रावर तमिळनाडूच्या सुगंधी देवदासन मरिन रिसर्च इन्स्टिट्यूटमार्फत प्रवाळ बेटे तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. युएनडीपीच्या या उपक्रमामुळे सिंधुदुर्गातील दुर्मीळ प्रवाळ बेटांचे संवर्धन तर होणार आहेच, परंतु सागरी पर्यटनासही मोठा फायदा होणार आहे. १३ प्रकारच्या दुर्मीळ प्रवाळांच्या प्रजाती सिंधुदुर्ग किल्ल्यानजीक मरिन पार्कच्या कोअर झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाळ बेटे आढळतात. याखेरीज तारकर्ली, वायरी, चिवला बीच, राजकोट या भागांतही काही प्रमाणात प्रवाळ बेटे आहेत. सिंधुदुर्गात टर्बिनिरिया मेसेन्टेरिना, पोरायटीज ल्युटीया, कॉसिनिरीया मॉनिलिज, सायफेस्ट्रिया मायक्रोथेरमा, सिफॅन, ब्लॅक व फायर आदी १३ प्रकारच्या दुर्मीळ प्रवाळांच्या प्रजाती आढळून येतात. १) युएनडीपीअंतर्गत उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात झुआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाकडून प्रवाळ बेटांवर होणारे तापमान वाढ, मानवी हस्तक्षेप, सागरी प्रदूषण यांचे परिणाम तपासण्यात येणार आहेत. तसेच सिंधुदुर्गात अन्य कोणकोणत्या ठिकाणी प्रवाळ बेटांच्या वाढीसाठी पोषक स्थिती आहे याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. २) प्रवाळ बेटांच्या अभ्यासानंतर आर्टीफिशल रिफ व कोरल ट्रान्सलोकेशन करण्यासाठी मत्स्य विभाग, जिल्हा प्रशासन, मेरीटाईम बोर्ड, स्नॉर्कलिंग गाईड, पारंपरिक मच्छिमार आदींचे प्रतिनिधी असलेली एक समिती स्थापन करण्यात येईल. ३) स्थानिक समितीच्या सहमतीने प्रवाळ बेटांच्या रक्षण व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात प्रवाळ बेटांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी धोरण आखण्यात येणार आहे. तसेच वेंगुर्ला, देवगड व मालवणच्या समुद्रात सुगंधी देवदासन मरीन रिसर्च इन्स्टिट्यूटमार्फत कृत्रिम प्रवाळ बेटे तयार करून या बेटांवर जिवंत प्रवाळांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. ४) नुकतेच झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या डॉ. वासुदेव त्रिपाठी, डॉ. सी. एच. सत्यनारायण, डॉ. राजकुमार राजन, आदी वरिष्ठ संशोधकांच्या पथकाने मालवणच्या समुद्रात डायव्हिंग करून प्राथमिक माहिती जमा केली आहे. ५) सिंधुदुर्गला देवगड, मालवण व वेंगुर्ला या तीन सागरी तालुक्यांचा मिळून १२१ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, मालवणच्या समुद्रात फक्त प्रवाळ बेटे आढळून येतात. या प्रवाळ बेटांमुळे मालवणमध्ये स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग, आदी प्रकारच्या सागरी पर्यटन व्यवसायात वाढ झाली आहे. ६) युएनडीपीच्या कृत्रिम प्रवाळ बेटांवर प्रवाळांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उपक्रमामुळे वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग, आचरा आदी ठिकाणच्या समुद्रातही प्रवाळ बेटे तयार होणार आहेत. यामुळे या भागातही स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग व्यवसायाला संधी मिळणार आहे. समुद्रातील दुर्मीळ प्रवाळ बेटांचे होणार संरक्षण (पान १ वरून) फायर आदी १३ प्रकारच्या दुर्मीळ प्रवाळांच्या प्रजाती आढळून येतात. १) युएनडीपीअंतर्गत उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात झुआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाकडून प्रवाळ बेटांवर होणारे तापमान वाढ, मानवी हस्तक्षेप, सागरी प्रदूषण यांचे परिणाम तपासण्यात येणार आहेत. तसेच सिंधुदुर्गात अन्य कोणकोणत्या ठिकाणी प्रवाळ बेटांच्या वाढीसाठी पोषक स्थिती आहे याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. २) प्रवाळ बेटांच्या अभ्यासानंतर आर्टीफिशल रिफ व कोरल ट्रान्सलोकेशन करण्यासाठी मत्स्य विभाग, जिल्हा प्रशासन, मेरीटाईम बोर्ड, स्नॉर्कलिंग गाईड, पारंपरिक मच्छिमार आदींचे प्रतिनिधी असलेली एक समिती स्थापन करण्यात येईल. ३) स्थानिक समितीच्या सहमतीने प्रवाळ बेटांच्या रक्षण व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात प्रवाळ बेटांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी धोरण आखण्यात येणार आहे. तसेच याच समितीच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला, देवगड व मालवणच्या समुद्रात सुगंधी देवदासन मरीन रिसर्च इन्स्टिट्यूटमार्फत कृत्रिम प्रवाळ बेटे तयार करून या बेटांवर जिवंत प्रवाळांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. ४) नुकतेच झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या डॉ. वासुदेव त्रिपाठी, डॉ. सी. एच. सत्यनारायण, डॉ. राजकुमार राजन, आदी वरिष्ठ संशोधकांच्या पथकाने मालवणच्या समुद्रात डायव्हिंग करून प्राथमिक माहिती जमा केली आहे. ५) सिंधुदुर्गला देवगड, मालवण व वेंगुर्ला या तीन सागरी तालुक्यांचा मिळून १२१ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, मालवणच्या समुद्रात फक्त प्रवाळ बेटे आढळून