शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

पर्यावरण संवर्धनाचे ‘रोल मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:49 IST

रामचंद्र कुडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कतळवडे : पर्यावरणाचे, वनस्पतींचे संवर्धन करायचे म्हटल्यास वन्य प्राण्यांचेही संवर्धन होणे गरजेचे आहे. हाच एक महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक वनीकरण विभाग प्रशासन व मळगाव ग्रामपंचायत यांच्या संकल्पनेतून प्रथमच मळगाव हद्दीत नरेंद्र डोंगरावर पाणी साठविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला. वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूने ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील नावीन्यपूर्ण उपक्रम

रामचंद्र कुडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कतळवडे : पर्यावरणाचे, वनस्पतींचे संवर्धन करायचे म्हटल्यास वन्य प्राण्यांचेही संवर्धन होणे गरजेचे आहे. हाच एक महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक वनीकरण विभाग प्रशासन व मळगाव ग्रामपंचायत यांच्या संकल्पनेतून प्रथमच मळगाव हद्दीत नरेंद्र डोंगरावर पाणी साठविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला. वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूने उंच डोंगरावर बंधारा बांधण्याचा जिल्ह्यातील हा नावीन्यपूर्ण उपक्रम असून, पर्यावरण संवर्धनाचे एक रोल मॉडेल ठरले आहे.सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतीने गावातील सर्वसामान्य जनतेच्या व शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीने चांगले उपक्रम हाती घेतले आहेत. गावातील शेतकºयांच्या भातशेतीचे वन्यजीव मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या नुकसानीमुळे शेतकºयांना शेती करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय डोंगरमाथ्यावरच झाल्यास शेतकºयांच्या शेतीचे नुकसान टळेल.यासाठी उंच डोंगरमाथ्यावर बंधारा बांधण्याबाबत मळगाव ग्रामपंचायतीतर्फे सामाजिक वनीकरण विभागाकडे वारंवार अर्ज करण्यात आले होते. अखेर सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र व मळगाव ग्रामपंचायत यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर मळगाव गावाच्या सीमाहद्दीत समुद्र सपाटीपासून दोनशे फूट उंचीवर बंधारा बांधण्यात आला. बंधाºयाच्या बांधकामासाठी डोंगरमाथ्यावरील दगडांचा वापर करण्यात आला आहे.या बंधाºयाचे नाव चिटणीस बंधारा असे पुरातन आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वी याच ठिकाणी चिटणीस नामक मळगाव गावातील सामाजिक कार्यकर्त्याने बंधारा बांधला होता. गावातील शेतकºयांना शेतीसाठी पाणी मिळावे, वन्यजीवांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यादृष्टीने हा उपक्रम राबविला असावा, असे येथील जाणकार मंडळी सांगतात. पण पुढे बंधाºयाची डागडुजी झाली नसल्याने तो तुटून गेला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गेल्या काही वर्षांत मळगाव गावात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. त्यामुळे मळगाव ग्रामपंचायत, वनसमिती मळगाव, सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, सुधाकर नाईक, रामकृष्ण वालावलकर, मळगाव पाणीपुरवठा कमिटी अध्यक्ष गजानन सातार्डेकर, गुरूनाथ गावकर, मळगाव ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील रोशनी जाधव यांच्या प्रयत्नातून या डोंगरमाथ्यावर बंधारा बांधण्यात आला.सध्या बांधलेल्या या बंधाºयांच्या ठिकाणी विपुल पाणीसाठा झाला आहे. फॉरेस्ट सर्व्हे नं. ३४ याठिकाणी हा बंधारा घातला आहे. सिंंधुदुर्ग जिल्हा उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल विजय कदम, वनपाल एस. एस. पाटील, वनरक्षक अमर काकतीकर, वनसंरक्षक प्रमोद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदार दामलो राठोड यांनी बंधाºयाचे बांधकाम केले आहे. मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर आणि वनसमिती मळगाव यांनी यासाठी प्रयत्न केले.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मळगाव-वेत्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या अखत्यारित मळगाव हद्दीत २५ लाखांच्या सोलर फेन्शिंग कुंपणाचे काम प्रगतीपथावर आहे. १२ किलोमीटर अंतरावर हे कुंपण घालण्यात येत असून, याचे ई-टेंडरिंगही झाले आहे. मळगाव-वेत्ये भागात वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी वन विभागांतर्गत हा उपक्रम राबविला आहे. इतर ठिकाणीही वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी असा उपक्रम राबविणे आवश्यक आहे.झुलत्या झोपाळ्याचा वनविभागाकडे प्रस्तावविरार येथील जीवदानी देवी मंदिराकडे असणाºया झुलत्या पुलाप्रमाणे मळगावचे ग्रामदैवत श्री देवी मायापूर्वचारी ते नरेंद्र डोंगर असा झुलता झोपाळा बांधावा, असा प्रस्ताव वन विभागाकडे पाठविला आहे. हा झुलता पूल झाल्यास मळगावसह नरेंद्र डोंगराचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार आहे. बंधाºयामुळे उन्हाळ्याच्या दिवसात वन्य जीवांना मुबलक पाणी मिळणार असून गावातील जलस्त्रोतांची पातळी वाढण्यासही मदत होणार आहे.