शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सासोलीतील रस्ता खचला

By admin | Updated: March 28, 2015 00:07 IST

मातीच्या भरावाने बुजविण्याचा प्रयत्न : भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले

कसई दोडामार्ग : दोडामार्ग- बांदा रस्त्यावरील सासोली मंदार हॉलनजीक असलेल्या धोकादायक वळणावरील डांबरी रस्ता शुक्रवारी सकाळी खचल्याचे निदर्शनास आले. धोकादायक वळणावर रस्ता खचला असतानाच मणेरी ते वेंगुर्ले अशी नळपाणी योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम करणाऱ्या कामगारांनी लागलीच जेसीबीच्या सहाय्याने मातीचा भराव टाकून बुजविण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, काँग्रेसचे सासोली मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बाळा धाऊसकर यांनी घटनास्थळी जाऊन नळपाणी योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम बंद पाडले. तसेच जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकामचे संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत काम बंद ठेवावे, असा सक्त इशाराही म्हापसेकर व धाऊसकर यांनी दिला. या पाईपलाईनमुळे पावसाळ्यात रस्ता खचण्याची शक्यता लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली होती. ही शंका बुधवारी पडलेल्या पावसामुळे खरी ठरली. पाईप लाईनच्या ठिकाणी टाकलेला मातीचा भराव दबला गेला तर सासोली दरम्यान पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू होते, त्या ठिकाणी धोकादायक वळणावरच शुक्रवारी सकाळी एका बाजूने पूर्ण खचून गेला. असे असताना त्या कामगारांनी तत्काळ लोकांच्या भीतीपोटी मातीचा भराव टाकून तात्पुरता बुजविला, असे राजेंद्र म्हापसेकर व बाळा धाऊसकर यांना समजताच त्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली व धोकादायक वळणावरच रस्ता खचल्याचे पाहून काम बंद पाडले. दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी बाबा टोपले व ग्रामस्थ त्याठिकाणी जमा झाले होते.