शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आरवली येडगेवाडी रस्ता धोकादायक

By admin | Updated: January 23, 2016 23:28 IST

‘बांधकाम’चे दुर्लक्ष : मोरी मोडकळीला आल्याने धोका

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येडगेवाडी हा प्रमुख रस्ता धोकादायक स्थितीत आहे. या रस्त्यावरील कुचांबे - बौध्दवाडी येथील मोरी मोडकळीस आली आहे. ही मोरी कधीही कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. या मार्गावरुन सध्या एस. टी.च्या पाच फेऱ्या होतात. या मार्गावर कुटगिरी, राजीवली, रातांबी या तीन गावातील ६३हून अधिक शालेय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी दररोज प्रवास करतात. या मार्गावरील एस. टी. अथवा अन्य वाहतूक बंद झाल्यास विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. ही बाब प्रवाशांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा रस्ता पूर्वी जिल्हा परिषदेकडे होता. मात्र, शासनाने जिल्ह््यातील प्रमुख सर्व मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर केले. त्याअगोदर जिल्हा परिषदेकडून या मोरीच्या बांधकामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी या मोरीचे १६ लाखाचे अंदाजपत्रक तयार करुन मंजुरीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठवले होते. मात्र, हा प्रमुख मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर अंदाजपत्रक आणि मंजुरी हा विषय थांबवण्यात आला. जिल्हा परिषदेकडे हा रस्ता असताना तुकाराम येडगे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. जिल्हा परिषदेने हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या गडनदी प्रकल्पामुळे खराब झाला असल्याचे नमूद करत, यासाठी पाटबंधारे विभागाने या मोरीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली. येडगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मोडकळीस आलेल्या पुलाच्या ठिकाणी भेट दिली व पुलाची पाहणी केली. मात्र, नंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हा प्रस्ताव रखडला व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोरीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले. कुचांबे (बौध्दवाडी) येथील मोरीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता व उपअभियंता यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या मोरीची पाहणी करुन घेतो, असे आश्वासन दिले. या आश्वासनाला महिना उलटून गेला तरीही सार्वजनिकचे कोणतेही अधिकारी याठिकाणी फिरकले नाहीत. या मार्गावरील मोडकळीला आलेल्या मोरीचा साकव कार्यक्रमात समावेश करुन ही मोरी या हंगामात बांधून घ्यावी. अन्यथा या मार्गावरील वाहतूक बंद होऊन विद्यार्थी व तीन गावातील रहिवाशांना याचा फटका बसणार आहे. या विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यास तीन गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरुन सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे तुकाराम येडगे व सचिन पाटोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)