शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

‘तिलारी’च्या रूंदावत्या पात्रामुळे धोका

By admin | Updated: April 12, 2015 23:58 IST

नदीकाठची जमीन ढासळतेय : बागायतदार शेतकऱ्यास प्रशासनाकडून उपाययोजना हव्यात

वैभव साळकर - दोडामार्ग  -तिलारी नदीच्या रुंदावणाऱ्या पात्रामुळे नदीकाठच्या शेतीबागायतींना मोठा धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस नदीचे पात्र रुंदावत असून पात्र नदीकाठची कित्येक मीटर जमीन गिळंकृत करत असल्याने शासनाने आवश्यक त्या ठिकाणी नदीतील गाळ दूर करण्याची मागणी नदीकाठच्या बागायतदारांतून होत आहे. तालुक्यातील सीमावर्ती भागातून तिलारी घाटातील डोंगरातून खराडी येथून तिलारी नदीचा उगम होतो. पुढे वीजघर येथील वीजनिर्मिती केंद्रात चंदगड तालुक्यातील धामणे धरणातील बाोगद्याद्वारे सोडण्यात येणारे पाणीही मुळस-वीजघर येथे तिलारी नदीला मिळते. परिणामी पावसात अगोदरच तिलारी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असताना त्यात वीज केंद्रात धामणे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे तिलारी नदीपात्रातील पाण्यात वाढ होते. त्यामुळे पावसाळाभर तिलारी नदीपात्र दुथडी भरून वाहते व नदीला मोठा पूर येतो. या पुराच्या पाण्यामुळे तिलारी नदीचे पात्र आपसुकच रूंदावते. त्यातच तिलारी नदीत वीजघर येथे धामणे धरणातून वीजघरच्या वीजकेंद्र्रातून सोडण्यात येणारे पाणी पुढे तेरवण-मेढे येथील उन्नेयी बंधाऱ्यात अडविले जाते व तिथे वीज निर्मिती केली जाते. मात्र, तेरवण-मेढे बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता मर्यादित असल्याने तेथे पाणी अधिक काळ साठविता येत नाही. परिणामी उन्नेयी बंधाऱ्यांच्या गेटवरून अतिरिक्त पाणी पुढे तिलारी नदीतून धाव घेते आणि अशी परिस्थिती उद्भवल्या कारणाने तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्याच्या सर्व गेट उघडणे तिलारी प्रकल्पाला भाग पडते. त्यामुळे तिलारी नदीला पूर येतो. तिलारी येथे आयनोडे-सरगवे येथील नदीवर धरण बांधण्यात आलेल्या नदीचा पूर्वी तिलारीत संगम व्हायचा. मात्र, आता धरण पूर्ण झाल्याने नदीचे एक पात्र पूर्णत: बंद झाले. परिणामी उन्नेयी बंधाऱ्यातून वेगाने येणारे पाणी तिलारी येथील निंबाळकर यांच्या शेती बागायतीत गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात घुसत असल्याने तेथे सुमारे २५ ते ३० मीटर नदीचे पात्र रूंदावले आहे. त्यामुळे तेथेच असलेल्या तिलारी येथील मोठ्या पुलाला आता मोठा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या तिलारीकडील पायथ्याच्या काही भागाचा भरावही वाहून गेला आहे. त्यामुळे पुलाला धोका अधिकच गडद झाला आहे.गेल्या कित्येक वर्षांपासूनचा नदीचा प्रवाहही दिवसेंदिवस बदलत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या शेतीबागायतीही तिलारी नदी गिळंकृत करते आहे. त्यातच नदीपात्रात साचलेला गाळ व वाढलेल्या झाडी यामुळे नदीचा प्रवाह सातत्याने बदलत आहे. तिलारी, भटवाडी, घोडगेवाडी, कोनाळकट्टा, साटेली भेडशी, परमे, कुडासे ते मणेरीपर्यंतच्या सर्वच बागायतदारांनी आता तिलारीच्या रुंदावणाऱ्या पात्राचा मोठा धसका घेतला आहे. यावर्षी तर मोठ्या प्रमाणात आलेल्या पुराने तिलारी नदीचे पात्र अधिकच रुंदावले आहे. त्यामुळे शासनाने यावर वेळीच उपाययोजना करून नदीकाठच्या आमच्या बागायती वाचवाव्यात, अशी मागणी बागायतदार नागरिकांतून केली जात आहे. शासनानेही या तिलारीच्या रुंदावणाऱ्या पात्राच्या समस्येवर योग्य तोडगा वेळीच शोधणे उचित ठरेल.नदीच्या पुलाचेही भवितव्य अडचणीत तिलारी येथील पुलालाही नदीच्या रूंदावत्या पात्रामुळे भविष्यात धोका संभवतो आहे. तिलारी प्रकल्पाकडे तेथे संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करूनही प्रकल्पाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्या पुलाचे भवितव्यही धोक्यात आहे.