शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मालवण किनारपट्टीला उधाणाचा फटका

By admin | Updated: July 16, 2014 23:20 IST

हजारोंची उपकरणे जळाली : दोडामार्गात पर्यटकांना वाचविले

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. मालवण किनारपट्टीवर उधाणाने मोठे नुकसान केले. लाटांच्या माऱ्यामुळे दांडी चौकचार मंदिराजवळील संरक्षक भिंत उखडली गेली, तर किनारपट्टीवरील माडाची झाडे कोसळली. वीजवाहिन्या तुटून शॉर्टसर्किट होऊन अनेकांच्या घरांतील विद्युत उपकरणे जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले. दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबरच्या कॉजवेवरून मांगेलीत वाहून जाणाऱ्या दोन पर्यटकांना वाचविले. जिल्ह्यात पावसाची संततधार चालूच आहे. त्यामुळे नुकसानीचे सत्रही सुरूच आहे. पावसामुळे ठिकठिकाणी सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यातील हिंदळे येथील दत्ताराम यशवंत तेली यांच्या घराची अंशत: पडझड होऊन दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. मिठबांव येथील ललिता सोमाजी लोके यांच्या घराचे नऊ हजार २२५ रुपयांचे, तर किंजवडे येथील अंकुश बाबूराव परब यांच्या घराचे दोन हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गनगरीतील शासकीय विश्रामगृह व पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्यासमोर, तर महामार्गावर हुमरमळा, पणदूर व पावशी या ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने येथील वाहतूक काहीकाळ ठप्प होती. कुडाळ तालुक्यातील आंबेरी येथे रिक्षावर झाड पडल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला गोवा बांबुळी येथे हलविले आहे. वेंगुर्ला येथील हॉटेल कोकण किनारा येथे विजेच्या लाईनवर झाड पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. (प्रतिनिधी)