शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती कल्याण समितीकडून योजनांचा आढावा

By admin | Updated: February 11, 2016 23:46 IST

रत्नागिरी दौरा : भरती, बढती, आरक्षणाच्या प्रश्नांबाबतही घेतली माहिती

रत्नागिरी : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना व अडचणींसह भरती, बढती, आरक्षण यासह विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत समितीचे प्रमुख डॉ. सुरेश खाडे यांच्यासह सदस्य लखन मलिक, रमेश बुंदिले, प्रकाश गजभिये यांच्यासह जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी विजय राठोड, अवर सचिव प्रकाशचंद्र खोंदले, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त यशवंत मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुसूचित जातीतील पदांच्या अनुशेषाची भरती आणि बढत्यांबाबत माहिती घेतली. तसेच अ‍ॅट्रॉसिटीकायद्यांतर्गत दाखल तक्रारींबाबत झालेली कार्यवाही, विद्यार्थी शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा या विषयांसह विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी समितीप्रमुख खाडे यांनी अनुसूचित जाती कर्मचाऱ्यांच्या भरती तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत संबंधित विभागप्रमुखांना आवश्यक सूचना दिल्या.तत्पूर्वी समितीकडून सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत जाणून घेतले. यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुपारच्या सत्रात समितीप्रमुखांसह इतर सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या अनुसूचित जातीच्या अधिकारी, कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि त्यांच्याकरिता राबवण्यात येणाऱ्या इतर कल्याणकारी योजनांबाबत लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी समितीसोबत आलेले मागासवर्गीय कक्षाच्या उपजिल्हाधिकारी कल्पना जगताप, राहुल लिंगरवार, प्रवीण लावंड, अधिकराव पाटील, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक.अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल तक्रारींबाबत कार्यवाहीची घेतली माहिती.शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा आदी विषयांवरही बैठकीत चर्चा.