शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
3
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
4
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
5
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
6
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
7
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
10
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
11
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
14
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
15
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
16
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
17
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
18
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
20
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता

एटीपीमुळे साडेतीन कोटींचा महसूल

By admin | Updated: February 12, 2015 00:40 IST

महावितरण कंपनी : २७ हजार ३२१ ग्राहकांनी घेतली सेवा

रत्नागिरी : महावितरण कंपनीने सध्या सर्वत्र स्वयंचलित वीजबिल भरणा केंद्र सुरू केली आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जानेवारी महिन्यात २७ हजार ३२१ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे महावितरणला ३ कोटी ४१ लाख ८ हजार ५०५ रुपयांचा महसूल मिळाला आहे.एटीएमच्या धर्तीवर महावितरण कंपनीने एटीपी मशिन बसवली आहेत. या मशिनव्दारे ग्राहकांना वीज बिल २४ तास भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण चार एटीपी केंद्र आहेत. रत्नागिरीतील एटीपी केंद्रांतर्गत रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यांतील ग्राहकांना वीजबिल भरता येते. रत्नागिरीतील एटीपी केंद्रावर १२१०१ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे १ कोटी ८६ लाख ८० हजार २३३ रुपयांचा महसूल उपलब्ध झाला आहे. सावर्डे, गुहागर, चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना चिपळुणातील एटीपी केंद्रावर वीजबिल भरणे शक्य होते. ४ हजार ४१५ ग्राहकांनी याचा लाभ घेतला असल्याने ३९ लाख १६ हजार ५४५ रूपयांचा महसूल मिळाला आहे. खेड तालुक्यातील एटीपी केंद्रावर खेड, लोटे, दापोलीतील ग्राहकांना वीजबिल भरणे शक्य होत असल्याने १८ हजार ५४७ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे २ कोटी २५ लाख ९६ हजार ७७८ रूपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात आले. कणकवलीतील ५ हजार २५७ ग्राहकांनी याचा लाभ घेतल्याने ३८ लाख ८२ हजार ५४० रूपये, तर मालवण केंद्रावर ३ हजार ५१७ ग्राहकांनी ३९ लाख ३९ हजार १८७ रूपयांचे बिल भरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ८७७४ ग्राहकांनी एटीपी केंद्राचा लाभ घेतल्याने ७८ लाख २१ हजार ७२७ रुपये जमा करण्यात आले. दिवसेंदिवस एटीपी मशिनचा वापर बिले भरण्यासाठी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. त्यामुळे या मशिनव्दारे मिळणारा महसूल हा जास्त असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.बँका, पतसंस्थांमधून वीजबिल स्वीकारले जात असले तरी तेथे असलेल्या रांगा यामुळे एटीपी केंद्रावर किंवा आॅनलाईन वीजबिल भरणे सोपे पडते. आॅनलाईन वीजबिल घरबसल्या भरणे सुकर होते. एटीपी केंद्रावरदेखील आता वीजबिल भरण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. सुटीच्या दिवशी बऱ्याच वेळा बिल भरण्यासाठी संबंधित व्यक्ती उपलब्ध नसते, अशावेळी वयोवृध्द किंवा अशिक्षित मंडळींची अडचण होते. काहीवेळा तर मशीन नादुरूस्त असल्याची साधी सूचनासुध्दा लावली जात नाही. त्यामुळे स्वयंचलित वीजबिल भरणा केंद्राबाबत अद्याप काही ग्राहकांमध्ये नाराजी आहे. संबंधित बाबींमध्ये आणखी सुधारणा केल्यास एटीपी केंद्रावर आणखी महसूल वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)