शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

महसूलचे धरणे आंदोलन

By admin | Updated: April 20, 2016 22:39 IST

कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष : विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ओरोस : राज्य महसूल कर्मचारी संघटनेसोबत झालेल्या चर्चेदरम्यान महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाने मान्य केल्या खऱ्या. मात्र त्याबाबत अद्यापही शासन निर्णय न झाल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना सादर करण्यात आले असून त्यात असे नमूद आहे की, राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी शासनाने ६ आॅगष्ट २०१४ रोजी झालेल्या बैठकीत नायब तहसीलदारांच्या ग्रेड पे ४३०० रूपये वरून ४६०० करणे, महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करणे, कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देणे, शिपायांना सायकलऐवजी मोटारसायकल देणे, तसेच नायब तहसीलदारांची सर्व पदे पदोन्नतीने भरणे. या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, मागण्या मान्य करून दीड वर्षाहून अधिक कालावधी झाला तरी महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन निर्णय झालेला नाही. आपल्या मागण्याबाबत शासन निर्णय व्हावा. यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने विविध लोकशाही मार्र्गाने आंदोलने छेडून शासनाचे लक्ष वेधण्यास सुरवात केली आहे. याचाच भाग म्हणून पहिल्या टप्प्यात २२ मार्च रोजी काळ्या फिती लावून काम केले होते. दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी निदर्शने तर १२ एप्रिल रोजी लेखणी बंद आंदोलन केले होते. मात्र, याबाबत शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे हे आंदोलन बुधवारी पुन्हा छेडण्यात आले. (वार्ताहर) संतोष खरात : १ मेपासून संपावर जाण्याचा निर्णय ४आज महसूल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात २१ नायब तहसीलदार, १०७ अव्वल कारकून, १५४ लिपिक, ९८ शिपाई सहभागी झाले होते. शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन निर्णय न झाल्यास १ मेपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष खरात यांनी सांगितले.