शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

गृहिणीच्या जबाबदारीबरोबर ‘ती’ करते दुचाकी दुरूस्ती

By admin | Updated: October 1, 2016 00:18 IST

--सलाम नारीशक्तीला

मेहरून नाकाडे--रत्नागिरी --गृहिणीची जबाबदारी सांभाळून गेली पंधरा वर्षे दुचाकी दुरूस्ती करणाऱ्या कल्याणी शशिकांत शिंदे यांनी आपल्या क्षेत्रात कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला आहे. पाना, स्कू्रू ड्रायव्हर घेऊन संपूर्ण दुचाकी खोलून त्यातील नेमका बिघाड काय आहे, हे शोधून दुरूस्त करण्यात कल्याणी यांचा हातखंडा आहे. सकाळी १० वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पतीसह स्वत:च्या गॅरेजमध्ये गाड्या दुरूस्तीमध्ये त्या व्यस्त असतात.कल्याणी यांनी दहावीनंतर आयटीआयमध्ये जाण्याचे ठरविले. इलेक्ट्रीशनला प्रवेश घ्यायचा हे मनोमन निश्चित केले. मैत्रिणींच्या सांगण्यावरून अर्जावर दोन ते तीन ट्रेड भरावयाचे असल्याने मोटार मेकॅनिकलचा ट्रेड नमूद केला. आयटीची प्रवेश यादी जाहीर झाली त्यावेळी कल्याणीचा नंबर लागला होता. परंतु इलेक्ट्रीशनऐवजी मोटार मेकॅनिकलच्या ट्रेडला तिला अ‍ॅडमिशन मिळाले होते. त्यावेळी कल्याणीच्या वर्गात दोन मुली व अन्य सर्व मुलगे होते. सर्वांनाच त्यावेळी कुतूहल होते. या प्रशिक्षण घेऊन पुढे करणार काय. दोन वर्षे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एस. टी.मध्ये अ‍ॅप्रेंटिसशीपसाठी अर्ज केला. परंतु महिला म्हणून अर्ज नाकारण्यात आला. इतर वर्गमित्रांना एस. टी.त संधी मिळाली. कल्याणी हिने नाराज न होता काही दुचाकी गॅरेज मालकांकडे कामासाठी विचारणा केली. त्यावेळीही महिला म्हणून तिला नकाराची घंटा ऐकावी लागली. आपण घेतलेल्या शिक्षणाचा काही उपयोग होईल का? यामुळे सतत निराशा येत असे. ३ ते ४ महिने वाया गेले. त्यावेळी आयटीआयच्या शिक्षकांनी शहरातील एका ओळखीच्या गॅरेज मालकाला विचारले. मुलगी आहे, परंतु काम प्रामाणिकपणे करेल, अशी शाश्वती दिल्यावर संबंधित गॅरेज मालकाने तिला कामाची संधी दिली. महिला म्हणून गॅरेजमध्ये गाड्या दुरूस्तीला येतील का? हा प्रश्न तर होताच, शिवाय महिला म्हणून वाईट नजरेने पाहणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही. यामुळे मालकाला थोडेसे टेन्शन होते. परंतु कल्याणी यांच्या कामातील प्रगती पाहून गॅरेजमालकाचा तिच्याबद्दल विश्वास वाढला. हळूहळू कल्याणीच्या कामाची माहिती झाली. वर्षभरानंतर गांधी मोटर्सचे मालक जयप्रकाश गांधी यांनी कल्याणी यांना बोलावून दुचाकी दुरूस्तीचे काम करशील का? अशी विचारणा केली. चार चाकी दुरूस्तीचे प्रशिक्षण घेतल्यामुळे दुचाकी दुरूस्त कशी करणार, हा प्रश्न होताच, शिवाय कधी दुचाकी हातातही घेतली नव्हती. त्यांच्या कामातील प्रगती पाहून पुन्हा त्यांना पुणे येथे ‘प्लेजर’ गाडी दुरूस्तीच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर ‘मेस्ट्रो’ गाडीचे खास प्रशिक्षण नागपूर येथे देण्यात आले. गांधी मोटर्समध्ये काम करीत असताना कल्याणी यांचे लग्न झाले. त्यांचे पती शशिकांत व मोठे दीर लहू हेदेखील मेकॅनिक असल्यामुळे त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले. दुचाकी दुरूस्तीत त्या निष्णात झाल्या. लग्नानंतर घरची जबाबदारी, मुले सांभाळून गॅरेजची नोकरी करण्यापेक्षा पतीच्या सोबतीने काम करण्याचे ठरविले. घरातील सर्व कामे आटोपून त्या सकाळी १० वाजल्यापासून गॅरेजमध्ये काम करीत असतात. ग्रीस लागल्यामुळे होणारे काळे हात, पाना, स्कू्र ड्रायव्हर, नटबोल्ट हातात घेण्यापेक्षा घरी जाऊन आईची धुणी भांडी कर, पोळ्या लाट, अशा शब्दात मला पुरूष सहकारी हिणवायचे. परंतु मनामध्ये जराही किंतु परंतु न बाळगता मनापासून दुरूस्तीचे काम करीत असे. मी निवडलेले क्षेत्र चुकीचे नव्हते. कोणतेही काम छोटे मोठे नसते, प्रामाणिकपणे केले तर यश जरूर मिळते. माझी चेष्टा करणारी मंडळीच आज तुझा अभिमान वाटतो, असे सांगतात, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं, असे कल्याणी सांगतात.