शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मच्छिमारांच्या कोचीनच्या अधिवेशनास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:07 IST

नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या राष्ट्रीय परिषदेस कोचीनच्या (केरळ) टाऊन हॉल येथे सुरुवात झाली. यावेळी काढलेल्या रॅलीस दहा राज्यांतील मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ठळक मुद्देमच्छिमारांच्या कोचीनच्या अधिवेशनास प्रतिसादहजारो मच्छिमार रॅलीत सहभागी

मालवण : नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या राष्ट्रीय परिषदेस कोचीनच्या (केरळ) टाऊन हॉल येथे सुरुवात झाली. यावेळी काढलेल्या रॅलीस दहा राज्यांतील मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रॅलीत केरळ येथील पारंपरिक वाद्ये, कोळी वेशभूषा लक्षवेधी ठरली. कोचीन मरीन ड्राईव्ह येथून सुरू झालेल्या या रॅलीचा टाऊन हॉल येथे समारोप झाला. यावेळी मच्छिमार एकजुटीचा विजय असो..., समुद्र आमच्या हक्काचा...नाही कुणाच्या बापाचा अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. निळे झेंडे, निळी टोपी परिधान करून हजारो मच्छिमार रॅलीत सहभागी झाले होते.रॅलीत एनएफएफ राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी केंद्रीय मंत्री के. थॉमस, महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी टी. पीटर(केरळ), व्हाईस प्रेसिडेंट ओलांसीओ सिमॉइस (गोवा), डॉ. कुमार वेलू, ज्योती मेहर, कार्यकारिणी सदस्य देबाशिष (पश्चिम बंगाल), उस्मान भाई (गुजरात), रमेश धुरी, रविकिरण तोरसकर, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती अध्यक्ष लिओ पोलोसो, उपाध्यक्ष किरण कोळी, रामकृष्ण तांडेल, राजन मेहर, फिलिप मस्तान, उज्ज्वला पाटील, पूर्णिमा मेहर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून छोटू सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, धर्माजी आडकर, गोविंद केळुसकर, दाजी जुवाटकर, गुरू जोशी आदींसह अन्य मच्छिमार प्रतिनिधी सहभागी झाले होते.तीन दिवसीय अधिवेशनात मच्छिमारांना भेडसावणाऱ्या स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय समस्यांवर चर्चा होणार आहे. संघटनेच्या पुढील वाटचालीची दिशा ठरविली जाणार आहे. तसेच नील अर्थव्यवस्था, सागरी मत्स्यपालन धोरण, मत्स्य व्यवसायातील महिलांचा सहभाग आणि समस्या तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद, मार्गदर्शन होणार आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. मत्स्य व्यावसायिक महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय समिती स्थापन व्हावी या मागण्यांसाठी जिल्ह्यातील मच्छिमार प्रतिनिधी या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे रविकिरण तोरसकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग