ओरोस : संविधानाने शैक्षणिक, प्रशासकीय व न्यायिकसारख्या यंत्रणा निर्माण करून भारतीय प्रजासत्ताकाला ठोस आकार दिला. या संविधानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन एकत्र येऊन व त्याची माहिती, महत्त्व, हक्क, कर्तव्ये यांची नीट जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा संविधान दिन २६ नोव्हेंबरला पाळला जातो, असे प्रतिपादन ज्ञानकुंज महाविद्यालयाचे प्रा. कोकितकर यांनी केले. यानिमित्त सर्वच ठिकाणी संविधान रॅली काढण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मानसपुरे, प्रा. हेमांगी सावंत आदी उपस्थित होते. प्रा. कोकितकर म्हणाले, भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थेत सामान्य माणूस जगत असताना संविधानाची माहिती व महत्त्व यापासून माणूस अनभिज्ञ राहिला आहे. त्यामुळे त्याला हक्काचे व कर्तव्याची नीट जाणीव निर्माण होत नसल्याने शासनाने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून पाळण्याचे आदेश निर्गुणित केले आहेत, असे प्रा. कोकितकर म्हणाले.याच दरम्यान सर्व विविध शैक्षणिक संस्थांनी, महाविद्यालयांनी हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला आहे. त्यातच सर्व महाविद्यालयांमध्ये संविधानाची माहिती विद्यार्थ्यांमार्फत रॅली काढून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. दरवर्षी सातत्याने हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे प्रा. कोकितकर यांनी सांगितले. ओरोस खर्येवाडी येथील सुभाष फाटक चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी ओरोस खर्येवाडी ते जैतापकर कॉलनी येथे संविधान दिनानिमित्त रॅली काढली. या रॅलीमध्ये प्रा. डॉ. एन. बी. खरात, प्रा. सुहास बांबुळकर, मुंबरकर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)
संविधान रॅलीला प्रतिसाद
By admin | Updated: November 28, 2014 00:11 IST