शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

अधिकाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडव

By admin | Updated: January 5, 2015 00:41 IST

आरोग्यमंत्र्यांची माहिती : सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाला भेट

सावंतवाडी : सावंतवाडी कुटिर रूग्णालयाला आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली. रूग्णालयात नवीन काय हवे, याची माहिती घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न तसेच रूग्णालय दुरूस्तीबाबत तातडीने निर्णय घेण्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. आरोग्यमंत्र्यांनी रूग्णांशीही संवाद साधलायावेळी आरोग्यमंत्री सावंत यांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यु. बी. पाटील यांनी स्वागत केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सहाय्यक संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक सतिश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक आर. डी. माने, डॉ. प्रविण पितळे आदी उपस्थीत होते.आरोग्यमंत्री सावंत यांनी प्रथम उपजिल्हा रूग्णालयात जाऊन ट्रामा केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व यंत्रणा व्यवस्थित आहे का, हे पाहिले तसेच रूग्णांकडे जाऊन त्यांची विचारपूस केली. तसेच मध्यंतरी शववाहिनीबाबत घडलेल्या प्रकाराबाबत डॉ. पाटील यांच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी डॉ. पाटील यांनी जनरेटरची मागणी केली. त्यांनी येत्या काही दिवसात जनरेटर देण्याचे मान्य केले. तर रूग्णालयात लागलेल्या गळतीबाबतचा प्रश्न निकाली काढू, असे सांगून यासाठी त्यांनी दोन कोटी रूपये देण्याचे मान्य केले. रूग्णालय अधिकाऱ्यांच्या निवास्थानाबाबतही त्यांनी माहिती घेतली. तसेच हा प्रश्न ही निकाली काढण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)आरोग्यमंत्र्यांची फिरकी रूग्णांना देण्यात आलेल्या चादरवरून आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची फिरकी घेतली. मात्र सहाय्यक संचालक अर्चना पाटील यांनी चादरीबाबत नवीन नियमावली लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी रूग्णालय स्वच्छता आजच ठेवली का, असे विचारताच अधिकारी चांगलेच चक्रावून गेले आणि नेहमीच करतो, असे उत्तर दिले.