शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

विकासकामे प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प

By admin | Updated: September 25, 2016 01:01 IST

विनायक राऊत : खवळे महागणपतीला सोन्याचा पाय बसविला

देवगड : लिम्का बुकमध्ये नोंद असलेल्या जगप्रसिध्द खवळे महागणपतीच्या डाव्या पायाला सोन्याचा पाय बसविण्याचे भाग्य मला मिळाले. हा माझ्या आयुष्यातील धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा क्षण कायम लक्षात राहणारा आहे. या खवळे महागणपतीच्याच कृपाशिर्वादाने रत्नागिरी-सिंंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील विकासाची कामे प्रगतीपथावर नेण्याचा संकल्पही केला असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी तारामुंबरी येथील खवळे महागणपतीच्या निवासस्थानी सांगितले. देवगड तारामुंबरी येथील जगप्रसिध्द असलेल्या खवळे महागणपतीला खवळे कुटुंबियांच्यावतीने सोन्याचा पाय खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते बसविण्यात आला. यावेळी सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, खवळे महागणपती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुर्यकांत खवळे, तालुकाप्रमुख विलास साळसकर, शहरप्रमुख संतोष तारी, गजानन प्रभू, दिगंबर जुवाटकर, निलेश सावंत, केतन खाडये, मेघशाम पाटोळे, चंद्रकांत खवळे, भाऊ खवळे, अमेय खवळे आदी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत म्हणाले, खवळे महागणपतीची लिम्का बुकमध्ये नोंद झाल्याने जगाचे लक्ष वेधले आहे. खवळे कुटुंबियांनी ३१६ वर्षाची परंपरा आजही अबाधित राखून त्याच धार्मिकेतेच्या दृष्टिकोनातून कुठलाही बदल न करता तशाच स्वरूपात परंपरागत उत्सव साजरा केला जात आहे. २१ दिवसांत तीन रूपात दिसणारा खवळे महागणपती हा अखंड जगात एकमेव गणपती आहे. या महागणपतीवर नुकताच प्रदर्शित झालेला विघ्नहर्ता महागणपती या चित्रपटाच्या माध्यमातून या महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. या गणपतीची वर्ल्ड रेकॉर्डमध्येही गणना होईल अशी अपेक्षा व असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. तसेच खवळे महागणपतीच्या ठिकाणचे विकासाच्या दृष्टिकोनातून काम करण्यात येणार असून रस्ता ंदुपदरीकरण व इतर मुलभूत सुविधा प्राप्त करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. गणेशोत्सवामध्ये २१ दिवस विराजमान असलेल्या महागणपतीला विसर्जनानंतरही पर्यटक या स्थळाला नक्कीच भेट देतील. यासाठी याठिकाणी विकासाची कामेही अग्रक्रमाने केली जाणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. देवगड तालुका हा पर्यटनाचे माहेरघर असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच आता या पर्यटन तालुक्याला धार्मिक स्थळांची जोडही मिळत असल्याने देवगड तालुक्याचा पर्यटनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकास होणार आहे यादृष्टिकोनातून खवळे महागणपतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी पर्यटनपूरक व्यवसाय करून पर्यटनवाढीचा संकल्प करावा असे मत त्यांनी व्यक्त केले. खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भगवा ध्वज उभारून जामसंडे येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख विलास साळसकर, सिध्दीविनायक न्यासाचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, महिला तालुका आघाडी प्रमुख वर्षा पवार, युवा शिवसेना तालुकाध्यक्ष निनाद देशपांडे, शहर महिला आघाडी प्रमुख अर्चना पाटील, शशिकांत घाडी, अनिकेत पेडणेकर, रूपेश नवलू, दादा पडेलकर आदी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांनी देवगड पोलिस स्टेशनच्या गणपतीचेही दर्शन घेतले. (प्रतिनिधी)