सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा किरणपाणी सागरी महामार्गावरील आरोंदा जेटीच्या ठिकाणी झालेले अतिक्रमण हटविण्याचा ठराव स्थायी समिती सभेत सभागृहाने घेतला. या प्रकल्पाला ५ जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह स्थायी समितीने भेट देण्याचा निर्णय घेतला.या जेटीमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि स्थानिक मच्छिमारांना होणारा त्रास लक्षात घेऊन केंद्रीय व राज्यस्तरीय पर्यावरण विभागाने दिलेली परवानगी रद्द करावी, असे सभागृहाचे मतही पर्यावरण विभागाला कळविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले.स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, सभापती अंकुश जाधव, स्नेहलता चोरगे, गुरूनाथ पेडणेकर, संजय बोंबडी, सदस्य सतीश सावंत, प्रमोद कामत, वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, पुष्पा नेरूरकर, संग्राम प्रभूदेसाई उपस्थित होते. आरोंदा किरणपाणी जेटीमुळे येथील पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. येथील मच्छिमारांनाही या जेटीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. याकडे सतीश सावंत यांच्यासह सर्वच सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. हे अतिक्रमण हटवावे, असा ठरावही यावेळी केला. स्थायी समिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, समिती सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम अभियंता, बंदर अधिकारी यांच्यासह जेटीची पाहणी करणार आहे. यावेळी समिती ग्रामस्थांशी चर्चा करेल. (प्रतिनिधी)नारायण राणे यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हडबडलेआरोंदा : आरोंदा जेटीला काँग्रेसने विरोध दर्शविल्यानंतर काँग्रेस नेते नारायण राणे यांनीच या आंदोलनात उडी घेतल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नारायण राणे यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर आज, मंगळवारी अचानक जिल्हाधिकारी ई. रवींद्रन व पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांनी आरोंदा जेटीला भेट दिली. (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची जेटीला भेटआरोंदा : आरोंदा जेटीला जिल्हाधिकारी ई. रवींद्रन व पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांनी भेट दिली. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांनी कोणालाच भेटीबाबत कल्पना न दिल्याने मच्छिमार तसेच जेटी विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी, सरपंच अत्माराम आचरेकर यांनी या प्रकाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या भेटीबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळली असून, भेटीची कल्पना ग्रामस्थ किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला दिली नाही. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी, असा सवाल जेटी विरोधी संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. यासंदर्भात रात्री उशिरा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सरपंच अत्माराम आचरेकर, जेटी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, सुधाकर नाईक, प्रशांत नाईक, दिलीप नाईक, प्रेमानंद नाईक, विद्याधर नाईक उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची जेटीला भेटआरोंदा : आरोंदा जेटीला जिल्हाधिकारी ई. रवींद्रन व पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांनी भेट दिली. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांनी कोणालाच भेटीबाबत कल्पना न दिल्याने मच्छिमार तसेच जेटी विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी, सरपंच अत्माराम आचरेकर यांनी या प्रकाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या भेटीबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळली असून, भेटीची कल्पना ग्रामस्थ किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला दिली नाही. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी, असा सवाल जेटी विरोधी संघर्ष समितीने उपस्थित केला आहे. यासंदर्भात रात्री उशिरा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सरपंच अत्माराम आचरेकर, जेटी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, सुधाकर नाईक, प्रशांत नाईक, दिलीप नाईक, प्रेमानंद नाईक, विद्याधर नाईक उपस्थित राहणार आहेत.
...ते वादग्रस्त अतिक्रमण हटविण्याचा ठराव
By admin | Updated: December 31, 2014 00:21 IST