शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

केमिकल झोनला विरोध करण्याचा ठराव

By admin | Updated: October 1, 2015 22:35 IST

जिल्हा परिषद : तीन दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा केमिकल झोन नको, केमिकल झोनला विरोध करण्यात येईल, असा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी ठराव मंजूर करुन तो ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज तिसऱ्या दिवशी अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी तीन दिवस चाललेल्या सभेतून प्रशासनाने बोध घ्यावा, असा सल्ला देत सभा संपल्याचे जाहीर केले. गेले तीन दिवस चाललेल्या या सभेत विषय पत्रिकेवर १५ विषय आणि आयत्या वेळचे अधिकाऱ्यांचे १७ विषय, याबद्दल सदस्य उदय बने यांनी आश्चर्य व्यक्त करतानाच आयत्या वेळच्या विषयांमध्ये पदवीधर शिक्षकांना बी. एड. परवानगीचा विषय का घेण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. जिल्हा परिषद शाळांना पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षकांना बी. एड. करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी उदय बने, विलास चाळके यांनी केली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बी. एड. हा दोन वर्षांचा कोर्स असल्याने त्यासाठी शिक्षकांना परवानगी देणे परवडणारे नाही. आयुक्तांनीही शिक्षकांना बी. एड. परवानगी देऊ नये, अशी सूचना दिल्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी स्पष्ट केले. परवागनीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी बने यांनी पदवीधर आवश्यक असल्याने त्यांना बी. एड. साठी परवानगी द्यावी, असे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीवरून आज तिसऱ्या दिवशी जोरदार चर्चा झाली. यामध्ये अधिकाऱ्यांना सदस्यांनी धारेवर धरले होते. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमावरून सदस्य भगवान घाडगे यांनी निधी असतानाही कामाचा आराखडाच तयार नसल्याने नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन विभाग असतानाही पर्यटन विकास आराखड्याची माहिती घेण्यात आलेली नसल्याने आणखी किती दिवस जाणार आहेत, असा प्रश्न उपस्थित घाडगे यांनी उपस्थित केला. महावितरणकडून पानवल येथे रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर विद्युत पोल उभारले आहेत. त्याची तत्काळ पाहणी करुन अहवाल सादर करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. रस्त्यांच्या कडेला अतिक्रमणे वाढत चालली आहेत. त्याकडे संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतानाही शासनाकडून येथे केमिकल झोन म्हणून करण्याचा घाट घातला जात आहे. त्याला सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. जिल्ह्यात केमिकल झोन नको, असा महत्त्वपूर्ण ठराव सर्वपंक्षीय सदस्यांनी एकमताने मंजूर केला. हा ठराव शासनाला तत्काळ पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच शासनाकडे पर्यटन विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणीही यावेळी सदस्यांनी सभेत केली. सभेला उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, बांधकाम व आरोग्य सभापती डॉ. अनिल शिगवण, महिला व बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, सदस्य भगवान घाडगे, विश्वास सुर्वे, राजेश मुकादम, सदस्या रचना महाडिक, अन्य सदस्य व अधिकारीवर्ग उपस्थित होता. (शहर वार्ताहर)