शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुखंडे यांच्या निषेधाचा ठराव

By admin | Updated: September 23, 2016 23:23 IST

काँग्रेस सदस्य आक्रमक : मालवण पंचायत समिती सभेत गदारोळ

मालवण : मालवण पंचायत समितीच्या सभेत सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या ठरावाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी काँग्रेस सदस्य आक्रमक बनले. विरोधी सदस्य उदय दुखंडे यांच्यावर सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करताना दुखंडे हे सभागृहाचा अवमान करत आहेत. पंचायत समिती ठरावाला किंमत नाही अशी सभागृहाबाहेर भूमिका घेणाऱ्या दुखंडे यांनी माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा, असे सांगत काँग्रेस सदस्यांनी सभा सुरु न करण्याचा पवित्रा घेतला. अखेर दुखंडे यांनी आपली भूमिका सभागृहाचा अवमान करणारी नव्हती असे स्पष्ट केले. मात्र, काँग्रेस सदस्यांचे समाधान न झाल्याने दुखंडे यांच्या विरोधात निषेधाचा ठराव बहुमताने घेण्यात आला. पंचायत समिती सभेच्या ठरावाला महत्व नसल्याचे वक्तव्य करणाऱ्या शिवसेना पंचायत समिती सदस्य उदय दुखंडे यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस सदस्य राजेद्र्र प्रभुदेसाई, देवानंद चिंदरकर, उदय परब, प्रसाद मोरजकर यांनी सभागृह दणाणून सोडले. यापुढे दुखंडे यांच्या कोणत्याही ठरावाला काँग्रेस सदस्य अनुमोदन देणार नाहीत, असे सांगताना पंचायत समिती सभागृहाच्या विरोधात दुखंडे यांनी कोणतीही भूमिका अथवा वक्तव्य केल्यास त्यांना सभागृहात पाय ठेवू दिला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका चिंदरकर यांनी मांडली. पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समिती सभागृहात सभापती हिमाली अमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती छोटू ठाकूर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, राजेंद्र्र प्रभूदेसाई, उदय परब, प्रसाद मोरजकर, श्रद्धा केळुसकर, भाग्यता वायंगणकर, सुजला तांबे, चित्रा दळवी यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी दुखंडे यांच्या विरोधात काँग्रेस सदस्यांनी ११ विरुद्ध १ असा बहुमताने निषेधाचा ठराव मंजूर केला. (प्रतिनिधी) दुखंडे यांचा खुलासा : मात्र, कॉँग्रेस सदस्यांची आक्रमक भूमिका मागील महिन्यात झालेल्या सभेत सी-वर्ल्ड प्रकल्प ३५० एकर मध्ये व्हावा, असा ठराव घेण्यात आला होता. या ठरावाला शिवसेना सदस्य उदय दुखंडे यांनी विरोध दर्शवला नव्हता. मात्र, दुखंडे यांनी दुसऱ्या दिवशी वायंगणी येथे पत्रकार परिषद घेत पंचायत समिती ठरावाला किंमतच नसल्याचे सांगितले होते. शुक्रवारी सभागृहात गदारोळ झाला असताना आपण सभागृहाचा कोणताही अवमान केला नाही, असे सांगत सभागृहाबद्दल आपल्याला आदर व सन्मानाची भावना असल्याचे स्पष्ट केले. मात्र काँग्रेस सदस्यांची आक्रमक भूमिका कायम राहिली. अखेर उदय परब यांनी दुखंडे यांच्या वक्तव्याबाबत निषेधाचा ठराव घेतला. याला काँग्रेसच्या सर्व सदस्यांसह सभापती हिमाली अमरे व उपसभापती छोटू ठाकूर यांनीही पाठींबा दर्शवला. तर देवानंद चिंदरकर यांनी ठरावाला अनुमोदन दिले.