शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

२00 शिक्षकांचा नेत्रदानाचा संकल्प

By admin | Updated: December 15, 2015 23:32 IST

सर्वश्रेष्ठ दान : महिला बालकल्याण सभापतींचाही समावेश

चिपळूण : नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांमुळे गरजूंना दृष्टी मिळणार असेल तर ते ईश्वरी कार्य आहे, असे समजून सावर्डे प्रभागातील २०० शिक्षकांसह महिला बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, माजी उपसभापती शशिकांत दळवी, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत जाधव आदी मान्यवरांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प सोडून आपले फॉर्म भरले. निमित्त होते हिवाळी क्रीडा स्पर्धांचे! हिवाळी क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती धनावडे यांनी केला. यावेळी माजी सभापती शशिकांत दळवी, पंचायत समिती सदस्य जाधव, खेरशेतचे सरपंच दिलीप मोरे, कोकरे सरपंच संजय घडशी, उपसरपंच संजय दळवी, मांडकी खुर्द सरपंच योगेश गुढेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोकरे - बुदरवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या या क्रीडा स्पर्धेला सावर्डे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते यांनी हा अनोखा सामाजिक उपक्रम घडवून आणला. शिक्षकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. नेत्रदानासारख्या पवित्र कार्याचे महत्त्व विस्तार अधिकारी मोहिते यांनी पटवून दिले. नेत्रदानासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी भरलेले २०० फॉर्म सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण या संस्थेकडे सुपूर्द केले. सभापती धनावडे यांनी मोहिते यांच्या या कार्याचा गौरव केला व आपल्याला ही चांगली संधी मिळवून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. (प्रतिनिधी)हिवाळी क्रीडा स्पर्धेचे निमित्त साधून शिक्षण विस्तार अधिकारी मोहिते यांनी सोडला नेत्रदानाचा संकल्प.क्रीडा स्पर्धांना परिसरातील विद्यार्थ्यांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.परिसरातील लोकप्रतिनिधींनीही भरले नेत्रदानाचे अर्ज. या अनोख्या उपक्रमाचे व संकल्पाचे ग्रामस्थांनी केले कौतुक.