शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बांदावासीयांचा इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध

By admin | Updated: February 20, 2015 23:09 IST

मतमतांतरे : मायनिंगबाधित क्षेत्र सामील करण्याची मागणी

बांदा : इको- सेन्सिटिव्ह झोनमुळे बांदा शहरातील विकासकामांवर दूरोगामी परिणाम होणार असल्याने बांदा येथे घेण्यात आलेल्या जनसुनावणीत इको सेन्सिटिव्ह झोनला प्रखरपणे विरोध करण्यात आला. मात्र, शहरातील प्रस्तावित सीमा तपासणी नाक्याचे क्षेत्र व शहरातील मायनिंगबाधित सर्व्हे नंबर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये घेण्याच्या ठरावावर संमती देण्यात आली. एकंदर जनसुनावणीत ग्रामस्थांची मतमतांतरे दिसून आली.बांदा शहरातील इको सेन्सिटिव्ह झोनमधील परिसंवेदनक्षेत्रातील सीमा ठरविणे, या झोनमधून कोणते क्षेत्र वगळावे या झोनचे फायदे तोटे याबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साडेतीन वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामसेवक संदीप बांदेकर, तांत्रिक अधिकारी संजय सावंत, वनपाल एस. एस. शिरगावकर, कृषी सहाय्यक देसाई, तलाठी एस. व्ही. नलावडे आदि उपस्थित होते.तांत्रिक अधिकारी संजय सावंत यांनी इको सेन्सिटिव्ह झोनबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. बांदा हे विस्तारीत होणारे शहर असून भविष्यात याठिकाणी नगरपंचायत होणार आहे. तसेच शहरात सीआरझेड लागू असल्याने याठिकाणी बांधकामाला मर्यादा आहेत. त्यात इको-सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यास येथील प्रस्तावित विकासकामांवर निर्बंध येणार आहेत. त्यामुळे या झोनला विरोध करण्यात आला. शहरातील सटमटवाडी येथे झोन लागू करण्यासंदर्भात ग्रामस्थांनी समर्थन दिले. तर सटमटवाडी येथील प्रस्तावित सीमा तपासणी नाक्याचे क्षेत्र तसेच शहरातील मायनिंगसाठी जाहीर करण्यात आलेले सर्व्हे नंबर इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ठ करुन शहरातील इतर क्षेत्र या झोनमधून वगळावे असा ठराव घेण्यात आला. या जनसुनावणीत माजी सरपंच शितल राऊळ, श्रीकृष्ण काणेकर, मंदार कल्याणकर, गुरु सावंत, अन्वर खान, जिवबा वीर, प्रशांत पांगम, ओंकार आळवे, अरुण मोर्ये, शेखर गोवेकर, म. गो. सावंत आदींसह ग्रामस्थांनी आपले प्रश्न मांडले आहेत. मात्र, शहराची लोकसंख्या सात हजारच्या घरात असूनही या जनसुनावणीला हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच ग्रामस्थ उपस्थितहोते. (प्रतिनिधी)