शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अबकारी कराला विरोध करा

By admin | Updated: May 19, 2016 23:58 IST

नीतेश राणेंचे सुवर्णकारांना आवाहन : विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हयातील सुवर्ण व्यावसायिकांनी एकत्र येऊन अबकारी कराचा विरोध करावा. आपण त्याला राजकारणविरहीत पाठींबा देऊ. प्रसंगी अबकारी कर या प्रश्नासाठी सुवर्ण व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्व करून विधानभवनावर मोर्चा काढू असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी देवगडमधील सुवर्ण व्यावसायिकांच्या संघटनेला दिले. केंद्रसरकार कायदा करून बसली आहे. त्याला संघटीतपणे विरोध करा अन्यथा हा कायदा कायमचा डोक्यावर बसेल यातून मोठे नुकसान होईल असा सल्लाही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी दिला.देवगड सुवर्णकार सराफ संघटनेने देवगड शासकीय विश्रामगृह येथे आमदार नीतेश राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी देवगड सुवर्णकार सराफ संघटनेचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, उपाध्यक्ष महेश घारे, सचिव नीलरत्न मालंडकर, संदिप तळवडेकर, किरण वेसणेकर, संदीप कुळकर्णी, घनश्याम कुळकर्णी, गिरीश कुळकर्णी, समीर कुळकर्णी, यतिन कुळकर्णी, प्रविण कुळकर्णी, महेश मोंडकर, विवेक मोंडकर, संजय बेलवलकर, वैभव घारे आदी उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या सन २०१६-१७ अर्थसंकल्पामध्ये सोन्यावर १ टक्के अबकारी कर लावण्यात आला आहे. त्या विरोधात देशातील सर्व सुवर्णकार-सराफांनी देशव्यापी बंद पुकारून आंदोलने केली आहेत. मुळात अबकारी कर आकारल्यामुळे इन्स्पेक्टर राज निर्माण होऊन सुवर्णकार व्यापारी देशोधडीला लागणार आहेत. सुवर्णकारांचा, सराफांचा कर आकारणीला विरोध नाही परंतु सुवर्णकार व्यवसायावर अबकारी कर लावण्यापेक्षा आयात केल्या जाणाऱ्या ९०५ हून अधिक टन सोन्यावर अबकारी कर आकारावा म्हणजे सरकारला यातून महसूल मिळेल. एक्साईज अधिकाऱ्यांचा जाच यापूर्वी ३० वर्षे सुवर्णकारांनी अनुभवलेला आहे. त्यामुळे सुवर्णकार या अबकारी कराला विरोध करत आहेत.प्रा. मधु दंडवते अर्थमंत्री असताना सुवर्णकारांना एक्साईजचा असलेला जाच त्यांनी पूर्णपणे अभ्यासानंतर तत्कालीन सरकारने अबकारी कर रद्द करून सुवर्ण नियंत्रण कायदा रद्द केला होता. त्यामुळे हा व्यवसाय कित्येक पट वाढल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. सरकारलासुध्दा करोडो रूपयांचा महसूल मिळाला आहे. याचा सरकारने विचार करणे आवश्यक आहे. ४२ दिवसांचा संप करूनसुध्दा सुवर्णकार सराफ संघटनांच्या मागणीकडे मोदी सरकाने संवेदनशील नजरेने पाहिले नाही. जेव्हा २०१२ साली तत्कालीन काँग्रेस सरकारनेसुध्दा अबकारी कर आकारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सुवर्णकार सराफ संघटनांचा विरोध पाहून काँग्रेस सरकारने २१ व्या दिवशी अबकारी कर रद्द करून सुवर्णकार सराफांना दिलासा दिला होता, तसा दिलासा यावेळीही मिळावा अशी विनंती केली आहे. (प्रतिनिधी)देवगड येथे आमदार नितेश राणे यांना देवगड तालुक्यातील सुवर्णकारांनी निवेदन दिले.