शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पर्ससीनधारक करणार ‘करो या मरो’ आंदोलन

By admin | Updated: February 11, 2016 23:57 IST

पंधरा दिवसात निर्णय घ्या...: पारंपरिक मच्छिमारांसाठी एकतर्फी भूमिका

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक मच्छिमारांसाठी एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोप पर्ससीन नेटधारक मच्छिमारांनी केला असून, अधिसूचनेबाबत १५ दिवसांत निर्णय न घेतल्यास करो या मरो भूमिका घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा मिरकरवाडा येथे मच्छिमारांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी मच्छिमार नेते सुलेमान मुल्ला, जहुर दर्वे, माजी नगरसेवक शरीफ दर्वे, नगरसेवक नुरुद्दीन पटेल, शब्बीर राजपूरकर, शौकत दर्वे, सिराज वाडकर, नजीर सरदार, बाबामियॉ मजगावकर, मकसूद हुना, असगर बांगी, रियाज मस्तान, सलाऊद्दिन हातवडकर, शहादत हबीब, सिकंदर हाजू आदी मिरकरवाडा, साखरीनाटे व अन्य गावातील पर्ससीन नेटधारक मच्छिमार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने एकतर्फी अधिसूचना काढली असून, पर्ससीन नेटधारक मच्छिमारांना दुर्लक्षित केले. त्यामुळे एक कुटुंबाला जगविण्यासाठी दुसऱ्या कुटुंबाचा बळी घेणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पर्ससीन नेटधारक मच्छिमारांनी उपस्थित केला. जिल्ह्यात १० टक्क्यांपेक्षा कमी पारंपरिक मच्छिमार आहेत. त्यामध्ये रापणकार हे मालवण आणि रत्नागिरीतील मिऱ्या भागात आहेत. त्यामुळे ९० टक्के पर्ससीन नेटधारक मच्छिमारांवर शासनाकडून अन्याय करण्यात आल्याचे मच्छिमारांनी सांगितले. पर्ससीन नेटधारक मच्छिमारांसाठी मासेमारीचा कालावधी डिसेंबरपर्यंत करण्यात आला आहे, ही अट शिथिल करावी. तसेच त्यांना मे महिन्यापर्यंत मुभा द्यावी, अशी मागणी यावेळी मच्छिमारांनी केली. पावसाळ्यानंतर दोन महिने खोल समुद्रातील मासेमारीसाठी वातावरण खराब असते. त्यामुळे पुढील दोन महिन्यात मासेमारी काय करणार व बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडणार, असा प्रश्न उपस्थित करुन एप्रिल व मे महिन्यामध्ये मासेमारी बंद केली, तर मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती मच्छिमारांनी व्यक्त केली. त्यामुळे ही अट शिथिल केली नाही, तर मच्छिमारांना आत्महत्या करावी लागेल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांत विचार करावा, अन्यथा करो या मरो, भूमिका घेऊन आंदोलन उभारून मोर्चा काढणार असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. सोमवंशी समितीच्या अहवालावरून एका बाजूने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तो चुकीचा असून, त्यासाठी आणखी एक समिती नेमून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा निर्णय घ्यावा, अशी मागणीही पर्ससीन नेटधारक मच्छिमारांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली. (शहर वार्ताहर)