शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची त्रासातून सुटका

By admin | Updated: January 14, 2015 23:52 IST

मानव विकास बससेवा : दोन दिवस केलेल्या आंदोलनाला यश

वैभववाडी : मानव विकासच्या बसेस विद्यालयाच्या प्रांगणातून सोडण्यासह अन्य मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी दोन दिवस केलेले आंदोलन यशस्वी झाले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे एस. टी. प्रशासनाचे डोळे उघडल्याने बुधवारी अ. रा. विद्यालयाच्या प्रांगणातून मानव विकासच्या बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची बसमध्ये चढताना अन्य प्रवाशांकडून होणाऱ्या त्रासातून सुटका झाली आहे.मानव विकासच्या एस. टी. बस विद्यालयाच्या प्रांगणातून सोडण्याच्या मागणीसाठी येथील कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी एस. टी. बस रोखली होती तर विद्यार्थ्यांना मानव विकासच्या बसमध्ये प्रवेश देऊ नये असे परिपत्रक एस. टी. प्रशासनाने कॉलेज व वाहतूक नियंत्रकांना दिले होते. त्यामुळे मंगळवारी विद्यार्थ्यांनी पुन्हा रास्ता रोको आंदोलन केले होते. दोन्ही आंदोलनावेळी संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे आणि पोलिसांनी मध्यस्थी करून विद्यार्थ्यांना शांत करीत तोडगा काढला होता.मानव विकासच्या बसेस कॉलेजच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर विभागनिहाय रांगा करून आधी विद्यार्थिनींनी व नंतर विद्यार्थ्यांनी बसमध्ये चढण्याच्या सूचना कॉलेज व्यवस्थापनाने दिल्या. तसेच दररोज या बसेस कॉलेजच्या प्रांगणातूनच सुटतील. त्यामुळे विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी कॉलेज सुटल्यावर प्रवेशद्वाराबाहेर जावू नये अशा सूचना संस्था अधीक्षक रावराणे यांनी दिल्या. कॉलेजच्या प्रांगणातूनच बसेस सुटणार असल्याने अन्य प्रवाशांकडून बसमध्ये चढताना होणाऱ्या त्रासातून विद्यार्थिनींची सुटका झाली आहे. (प्रतिनिधी)आदेश मिळालेविद्यार्थ्यांच्या मागण्यांची पूर्तता एस. टी. प्रशासनाने तत्काळ न केल्यास पुन्हा रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता. बुधवारी कॉलेज सुटून विद्यार्थिनी आणि विद्यार्थी बस स्थानकावर पोचले तरी मानव विकासच्या बसेस कोठून सोडायच्या याबाबत वाहतूक नियंत्रकांना वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले नव्हते. अखेर ११.४५ वाजताच्या सुमारास कॉलेजच्या प्रांगणात चला बस तेथून सुटतील असे बसस्थानकातून सांगण्यात आले. त्यामुळे बसस्थानकातून विद्यार्थी, विद्यार्थिनी पुन्हा कॉलेजमध्ये परतल्या.