शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

मालवण ग्रामीण रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 17:46 IST

मालवण येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात सुविधांचा अभाव असल्याने मृतांच्या नातेवाईकांनाच मृतदेहासाठी लागणारे साहित्य खरेदी करावे लागत आहे. तसेच शवविच्छेदनगृह परिसरातही झाडी वाढली असून रुग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा हेळसांडपणाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देशवविच्छेदनगृहात असुविधा रुग्णालयात डासांचाही प्रादुर्भाव वाढला

मालवण,9  : येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात सुविधांचा अभाव असल्याने मृतांच्या नातेवाईकांनाच मृतदेहासाठी लागणारे साहित्य खरेदी करावे लागत आहे. तसेच शवविच्छेदनगृह परिसरातही झाडी वाढली असून रुग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा हेळसांडपणाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

आधी दीपक वाघमारे अपघाती मृत्यू प्रकरणात तर आता मसुरे डांगमोडे येथे नव दांपत्याने केलेली आत्महत्या या प्रकरणात हे प्रकर्षाने जाणवले. रुग्णालय प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे मृतांच्या नातेवाईकांची हेळसांड होण्याचे प्रकार वाढल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.

मसुरे-डांगमोडे येथील संतोष गंगाराम ठाकूर व सानवी ठाकूर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी शनिवारी ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात आणण्यात आले. त्याची माहिती येथील पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांना दिली होती. यावर डॉ. पाटील यांनी ही घटना मसुरे येथील असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाºयांना शवविच्छेदनासाठी बोलविण्याचे सांगितले.

गोळवणचे वैद्यकीय अधिकारी रविवारी सकाळी साडेदहा वाजता ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी दाखल झाले. मात्र डॉ. पाटील यांनी आपण आल्यावरच शवविच्छेदन करावे असे सांगितल्याने गोळवणचे वैद्यकीय अधिकारी थांबले होते.

रविवारी ११.३० वाजता शवविच्छेदनास सुरुवात झाली. यात शवविच्छेदन करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मृतांच्या नातेवाईकांनाच बाजारातून आणण्यास सांगण्यात आले. डॉ. पाटील हे मृतदेह पाहून त्याठिकाणी गोळवणच्या वैद्यकीय अधिकाºयांना सूचना देत निघून गेले.

ग्रामीण रुग्णालयात कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शहरात वारंवार होणाºया खंडित वीज पुरवठ्यामुळे विच्छेदन करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. महिलेच्या मृतदेहाचे विच्छेदन करताना महिला डॉक्टर उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असताना महिला पोलिस कर्मचाºयांचे सहकार्य घेण्यात आले.

शवविच्छेदनगृहाच्या परिसरात अस्वच्छताग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाच्या परिसरात प्रचंड झाडी वाढली आहे. तसेच परिसरात नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. याठिकाणी मृताचे नातेवाईक तसेच पोलिसांना थांबण्यासाठी अगर पोलिसांना पंचनामा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. अस्वच्छतेमुळे डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून स्वच्छता ठेवण्याबाबत कोणतेही नियोजन नसल्याने मसुरेतील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.