शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

वैद्यकीय अधिकारी बदला

By admin | Updated: November 7, 2014 23:39 IST

मागणीचा ठराव : देवगड पंचायत समितीची बैठक

देवगड : देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कार्यक्षम नसून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याने त्यांच्या जागी दुसरा सक्षम अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव सभागृहासमोर आणण्यात आला व तशी जोरदार मागणी करण्यात आली.देवगड ग्रामीण रूग्णालयाला उच्च दर्जा मिळूनही येथे रूग्णसेवा सुधारत नाही, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होऊनही त्याची चौकशी किंवा कारवाई झाली नसल्याबद्दल पंचायत समिती सदस्या व भाजपा गटनेते संतोष किंजवडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. देवगड पंचायत समितीची मासिक सभा किसानभवन सभागृहात शुक्रवारी झाली. यावेळी दाभोळे बौद्धवाडी येथील विंधन विहिरीचा प्रलंबित प्रश्न व महावितरणचे अधिकारी सभेला गैरहजर राहण्याचा प्रश्नही त्यांनी लावून धरला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती डॉ. स्मिता राणे आदी उपस्थित होते.सहाय्यक गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी प्रभारी सचिव म्हणून काम पाहिले. यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या बंधुंना सभागृहातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी यांच्या अभिनंदनाचे ठराव मंजूर करण्यात आले. तसेच अंधेरीचे आमदार अमित साटम यांच्याही अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.देवगड तालुक्यामध्ये स्वतंत्र सर्व्हे होऊन महावितरणच्या विद्युतवाहिन्या कोणकोणत्या घरांवरून गेल्या आहेत व कोठे धोकादायक परिस्थिती आहे याचा शोध घेण्याचे सभापती सारंग यांनी निर्देश दिले. तसेच आधी घर होते की विद्युतवाहिनी? याचेही निरीक्षण या चौकशीत नमूद करावे, असा निर्देशही त्यांनी दिला. देवगडात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असून त्याबाबत त्वरित पावले उचलण्याची मागणी पंचायत समिती सदस्या हर्षा ठाकूर यांनी केली. तर रस्त्याच्या कडेचे वाढलेले गवत व झाडेझुडपे तत्काळ काढून टाकण्यासाठी कारवाईची मागणी रवींद्र जोगल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यासंदर्भातील चर्चेत केली.पशुपालन विभागातर्फे नवीन पशुपालन स्किमचे परिपत्रक वाचून दाखविताना संबंधित अधिकाऱ्यांनी ४० शेळ््या व २ बोकड यांच्या संचासाठी ३ लाख रूपयांचा प्रस्ताव व त्यांना ५० टक्के अनुदानासाठी प्रस्ताव देण्याचे सर्व सदस्यांना आवाहन केले. १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्वच्छता अभियानाची माहितीही यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी सभासदांना दिली. (प्रतिनिधी)दाभोळेत विंधन विहिरींचा प्रश्न प्रलंबितदाभोळे बौद्धवाडी येथील विंधन विहिरीचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित असताना व तशी वस्तुस्थिती असताना संबंधित प्रशासनाने काम सुरू असल्याचे उत्तर दिले आहे. ते धादांत खोटे असून सभापती सारंग यांनी स्वत: या भागाला भेट देऊन खात्री करावी, अशी मागणी संतोष किंजवडेकर यांनी केली. यावर सभापतींनी चौकशी व प्रत्यक्ष भेट देण्याचे मान्य केले. यावेळी प्रत्येक गावासाठी एक स्वच्छता सहाय्यक असावा, सक्षम कृषी सहाय्यक अधिकारीही या तालुक्यासाठी नेमावा, अशी मागणी त्यांनी केली.