शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

फेरफार नोंदी आता आॅनलाईन मंजूर होणार

By admin | Updated: April 5, 2016 00:56 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : मंडल अधिकारीही आॅनलाईन

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकारी कार्यालये आॅनलाईन होत असून नागरीकांच्या फेरफार नोंदी आता आॅनलाईन मंजूर होणार आहेत. त्यातील वैभववाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तीन तालुक्यांना शासनाकडून मंजूरी मिळाली असून प्रथम हे तीन तालुके आॅनलाईन होत असल्याची माहिंती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी दालनात झाला. यावेळी माहिती देताना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. महसूल यंत्रणेतील मंडल अधिकारी कार्यालये आता आॅनलाईन होणार आहेत. सर्व तालुक्यांच्या ‘सिडीज’ तयार करण्याचे काम ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे शासन निर्देश होते. त्यानुसार सर्व तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन हे काम पूर्ण केले आहे. या सर्व सिडीज शासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यातील वैभववाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला हे तीन तालुके प्राधान्यक्रमाने घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आता नागरिकांच्या या दस्तऐवजाच्या नोंंदी आता आॅनलाईन मंजूर होणार आहेत. नोंदी प्रलंबित राहणार नाहीत. आपल्या जिल्ह्यात १८ लाख सात-बारा धारक आहेत. आता तहसीलदार आणि भूमिअभिलेख कार्यालयाच्या रेकॉर्डचे स्कॅनिंगही सुरू असून हे कामही ४० टक्के पर्यंत पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये ६९ पदांच्या भरती प्रक्रियेची यादी प्रसिध्द होऊन त्यांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत. याबाबत तक्रारी असल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याचा अहवाल नुकताच शासनाकडे पाठविण्यात आला असून शासनाकडून आदेश प्राप्त होताच रखडलेली सर्व नियुक्ती पत्रे उमेदवारांना देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीपोटी प्राप्त ३७ कोटी निधीपैकी ३५ कोटी ४३ लाखांचे वाटप झाले आहे. त्याची आकडेवारी ९६ टक्के आहे. अखर्चित राहिलेले १ कोटी ५७ लाख रूपये शासनास पाठविण्यात आले असून हा निधी यावर्षी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी भंडारी यांनी सांगितले. लोकसंख्या नोंद करण्याचा कार्यक्रम ९५ टक्के पूर्ण झाला आहे. त्यामध्ये आधारकार्डच्या नोंदी असल्याने त्याही पूर्ण झाल्या आहेत. ते कामही १०० टक्के पूर्ण होईल तसेच वैभववाडी तालुक्याचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचेही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी स्पष्ट केले. केंद्र शासनाच्या यु. एन. डी. पी. प्रकल्पांतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा व्याघ्रेश्वर येथे देशातील दुसरा क्रॅब हॅचरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. देशात केवळ तामिळनाडूमध्ये असा प्रकल्प आहे. यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च आहे. केंद्र शासनाचे विशेष सचिव सुशिलकुमार यांनी नुकतीच २०१२ पासून सुरू असलेल्या यु. एन. डी. पी. प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गात क्रॅब हॅचरी (खेकडे पालन) प्रकल्प सुरू करणार असल्याचे सागितले. छोटी मासळी जाळ्यातून निसटण्यासाठी गोलाकार जाळे विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही मासळी जाळ्यात अडकण्यापासून वाचते. त्यामुळे दुष्काळाचा संभवणारा धोका टळू शकतो. हा चांगला उपक्रम असल्याने जिल्हा नियोजन मधून १९ लाख रूपये देण्यात आले. अशा प्रकारे ३१७ मच्छिमारांना या जाळ्याचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)