शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक साधन संपत्तीव्दारे उत्पन्न वाढीसाठी रिमोट सेसिंग मॅपिंग महत्वाचे : केसरकर

By admin | Updated: June 16, 2017 17:15 IST

सिंधुदुर्गनरीत महाराष्ट्र रिमोट सेसिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटरच्या कार्यशाळेचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. १७: नैसर्गिक साधन संपत्तीचा उत्पन्न वाढीसाठी पुरेपुर वापर व्हावा, या दृष्टिकोनातून रिमोट सेसिंगव्दारे मॅपिंग करणे महत्वाचे आहे. महाराष्ट्र सुंदर संवेदन उपयोजना केंद्र (नागपूर) (एमआरसॅक) या संस्थेव्दारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रिमोट सेसिंगव्दारे मॅपिंग हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय विभागानी या चर्चासत्रामध्ये मिळणाऱ्या माहितीचा लाभ घेऊन आपले विभागाचे अचूक व योग्य माहिती पुरवावी असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.सिंधुदुर्गनरीतील जिल्हा नियोजन समितीच्या नविन सभागृहात एमआरसॅक म्हणजे महाराष्ट्र रिमोट सेसिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटरच्या वतीने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संचालक दास, सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ. घारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांदा ते बांदा हा शासनाचा १४२ कोटी रुपयांचा महत्वकांक्षी उपक्रम सुरु आहे. या दृष्टीने जिल्ह्यात उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीची अचूक माहिती आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्याचे रिमोट सेसिंग मॅपिंग करण्यात येत असल्याचे स्पष्ट करुन केसरकर म्हणाले की, पर्यटन, कृषी, फलोद्यान, मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन, क्रीडा विकास, रस्ते विकास, पाणी पुरवठा, दुग्धविकास आदी सर्व विभागाशी संबंधीत अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याबरोबरच जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्ती कुठे व कशाप्रकारे उपलब्ध आहे, याचीही माहिती या मॅपिंग कार्यक्रमामुळे उपलब्ध होणार आहे. अधिकाऱ्यांनी अतिशय तन्मयतेने या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन कार्यशाळेचा हेतू विशद केला. संचालक दास यांनी माहिती कोणत्या प्रकारची व कशा पध्दतीने अपलोड करावयाची याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस सर्व शासकीय खाते प्रमुख उपस्थित होते.