शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे आरामबसने दुचाकीला उडवले; २ जखमी, १ गंभीर

By admin | Updated: September 12, 2016 21:57 IST

नीता ट्रॅव्हल्सच्या बसने दुचाकीला उडवल्याची घटना सोमवारी रात्री ८.२0च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथे पॉवर हाऊसनजीक घडली.

ऑनलाइन लोकमत 

राजापूर, दि. १२ -  मुंबईकडे जाणाऱ्या नीता ट्रॅव्हल्सच्या बसने दुचाकीला उडवल्याची घटना सोमवारी रात्री ८.२0च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथे पॉवर हाऊसनजीक घडली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. 
 
गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक अधिक असतानाही खासगी आरामबसेस अतिशय वेगाने जात असल्यानेच अपघात घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. 
 
सोमवारी दुपारी गोव्याहून निघालेली नीता ट्रॅव्हल्सची बस सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास राजापुरात आली. महामार्गावरील पेट्रोल पंपापासून काही अंतरावर या बसने ओणीकडून राजापूरला जाणाऱ्या एका दुचाकीला उडवले. संकेत पावसकर (३0, राजापूर) आणि काशीनाथ कुडकर (२५, राजापूर) हे दोघेजण त्या दुचाकीवर होते. बसच्या धडकेमुळे दोघांच्याही डोक्याला दुखापत झाली आहे. त्यातील संकेतची प्रकृती गंभीर आहे. 
 
अपघात झाल्यानंतर बसचे दोन चालक घटनास्थळावरून पळून गेले. तिसरा चालक गाडीमध्ये झोपला होता. अपघातानंतर बस थोड्या मागे असलेल्या एका हॉटेलनजीक उभी करून ठेवण्यात आली आहे. दोन्ही जखमींना तत्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.