शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनासाठी आलेल्या आरामबसला अपघात; ४६ जखमी; सहा गंभीर

By admin | Updated: December 23, 2016 23:14 IST

करबुडे येथील घटना : सर्व जखमी भिवंडीतील

रत्नागिरी : गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे देवदर्शनासाठी जाणारी आरामबस पलटी होऊन झालेल्या अपघातात ४६ प्रवासी जखमी, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४.१५च्या सुमारास करबुडे फाटानजीक घडली. या अपघातातील सर्व जखमी दांभाडे (भिवंडी, ठाणे) येथील राहणारे आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. भिवंडी येथील दांभाडे गावातील ४६ प्रवासी आरामबसने गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी येत होते. संतोषकुमार नाहक हा आपल्या ताब्यातील आराम बस (एमएच-०५-एझेड- ६५५) घेऊन शुक्रवारी सकाळी ५च्या सुमाराला दांभाडे येथून निघाला. दुपारी ३.५० सुमारास ही आराम बस मुंबई - गोवा महामार्गावरील निवळीहून गणपतीपुळेच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते. करबुडे फाटा येथील वळणावर ही गाडी आली असता चालकाला वळणाचा अंदाज आला नाही आणि गाडीवरील ताबा सुटून गाडी पलटी झाली.गाडी पलटी होताच सुमारे ३० फूट फरपटत गेली. अपघाताची माहिती मिळताच करबुडे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्याला सुरुवात केली. तेथीलच ग्रामस्थांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिका पाठवून जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. (वार्ताहर)गंभीर जखमी : या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी सुमता कातर भुई (६५), शुभम दिनेश शैलार (८), प्रणय पंडित ठाकरे (११), संतोष कुमार नाहक (३५) यांची नावे कळली असून, उर्वरीत दोघांची नावे अद्याप कळलेली नाहीत.