शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गणेश घाटाकडील रस्ता मोकळा करा

By admin | Updated: September 14, 2015 23:52 IST

आरोंदा जेटी प्रश्न : वैभव नाईकांची मागणी

ओरोस : आरोंदा किरणपाणी जेटीवरील गणेश विसर्जन घाटाकडे जाणारा पारंपरिक मार्ग मे. व्हाईट आॅर्चिड इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीने अचानकपणे सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक टाकून पूर्णत: बंद केलेला आहे. गणेश विसर्जन मार्गात अडथळा निर्माण झाल्याने आरोंदा परिसरातील गणेशभक्तांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन गणेश विसर्जन घाटाकडे जाणारा मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, आरोंदा बाजारपेठ व इतर वाडीतील सर्व ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या गणेश विसर्जन हे किरणपाणी नदीमध्ये ब्रिटीश कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या जेटीवर करीत आहेत. यावर्षी मात्र तेथील जेटीचे विकासक मे. व्हाईट आॅर्चिड इस्टेट प्रा. लि. या कंपनीने ४ व १६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन पारंपरिक घाटावर करण्यास कोणताही प्रतिबंध नसल्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना लेखी स्वरूपात पत्र दिले होते. मात्र असे असतानाही या कंपनीने अचानकपणे विसर्जन मार्गावर मोठ्या सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक टाकून मार्ग पूर्णत: बंद केला आहे. गणेश विसर्जन घाटाकडे जाणारा मार्ग बंद झाल्यामुळे आरोंदा परिसरातील गणेशभक्तांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खासद विनायक राऊत यांनी स्वत: आरोंदा येथे भेट देऊन मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. आता जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते आरोंदावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)